Join us

​‘बाहुबली २’मध्ये असा दिसणार राणा डग्गूबतीचा ‘भल्लालदेव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 10:24 IST

दोन वर्षांपूर्वी ‘बाहुबली : द बिगिनिंग’च्या स्वरुपात भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात भव्यदिव्य चित्रपट पाहायला मिळाला. या बिग बजेट चित्रपटातील ...

दोन वर्षांपूर्वी ‘बाहुबली : द बिगिनिंग’च्या स्वरुपात भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात भव्यदिव्य चित्रपट पाहायला मिळाला. या बिग बजेट चित्रपटातील व्हीएफएक्स इफेक्टस् आणि अ‍ॅक्शन पाहून तर प्रेक्षक आवाक झाले. हॉलीवूड अ‍ॅक्शनपटांनाही लाजवेल अशा भव्यतेमुळे बॉक्स आॅफिसचे सर्व रेकॉर्ड या सिनेमाने मोडले.‘बाहुबली : द बिगिनिंग’च्या ग्रँड यशाचा शिल्पकार राणा डग्गूबतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या हँडसम हंक अभिनेच्या शक्तीशाली व क्रुर ‘भल्लालदेव’च्या परफॉर्मन्समुळे प्रभासच्या ‘बाहुबली’ला तोडीस तोड व्हिलन मिळाला. म्हणून तर ‘बाहुबली २’मध्ये राणाचा लूक आणि व्यक्तिरेखा कशी असेल याकडे फॅन्सचे लक्ष होते.आता त्यांची प्रतीक्षा संपली. राणाच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी त्याला व चाहत्यांना अनोखी भेट देत सोशल मीडियावर त्याच्या ‘भल्लालदेव’चा अधिकृत लूक शेअर केला आहे.हे पोस्टर पाहून तर हे स्पष्ट होते की, भल्लालदेवच्या भूमिकेत राणा अधिकच खतरनाक अधिकच क्रुर असणार. गेल्या महिन्यात ‘बाहुबली : द कन्क्लुजन’चे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले होते. यामध्ये प्रभासचा ‘बाहुबली’ दिसतो. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे.नुकतेच त्याच्या ‘गाझी’ चित्रपटातील फर्स्ट लूकदेखील रिलीज करण्यात आला. या चित्रपटात तो नेव्ही आॅफिसरच्या भूमिकेत आहे. ‘गाझी’ हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याचे कथानक ‘पाण्याखालील युद्ध’ या संकल्पनेवर आधारित आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर करून यात स्टंट्स आणि साहसी दृश्ये दाखवण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जगातील अनेक तंत्रज्ञ या चित्रपटावर काम करीत असून १७ फेबु्रवारीला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.