Join us

Bahubali 2 : नव्या पोस्टरमधील ‘अमरेंद्र बाहुबली’चा पहा अंदाज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 13:51 IST

या आठवड्यात रिलीज होत असलेल्या ‘बाहुबली-२’बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली जात आहे. याचा प्रत्यय सोशल मीडियावर येत असून, ...

या आठवड्यात रिलीज होत असलेल्या ‘बाहुबली-२’बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली जात आहे. याचा प्रत्यय सोशल मीडियावर येत असून, बºयाचशा नेटिझन्सच्या वॉलवर ‘बाहुबली-२’ची खरपूस चर्चा केली जात असल्याचे दिसून येत आहे. आता या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये अभिनेता प्रभास याचा अमरेंद्र बाहुबलीचा अंदाज बघण्यासारखा आहे.

पोस्टरमध्ये बाहुबली खूपच आकर्षक रूपात दिसत असून, त्याच्या बॉडी लँग्वेजवरून हेच स्पष्ट होते की, तो कुठल्याही युद्धासाठी तयार आहे. कारण या पोस्टरमधील बाहुबलीचे तेवर बघण्यासारखे असून, सध्या प्रेक्षकांना हे नवे पोस्टर खूपच भावत आहे. चित्रपटात प्रभाससोबत अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, सत्यराज प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

हा चित्रपट देशभरात ६५०० स्क्रीन्सवर रिलीज केला जाणार असून, हा पहिलाच चित्रपट असेल जो एवढ्या मोठ्या प्रमाणात स्क्रीन्सवर एकदाच रिलीज केला जाणार आहे. त्याचबरोबर असाही अंदाज व्यक्त केला जात आहे की, जर हा चित्रपट ६५०० स्क्रीनवर रिलीज केला जाणार असेल तर पहिल्याच दिवसाचे कलेक्शन ६० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. शिवाय २८ एप्रिल हा सुटीचा दिवस नसतानाही चित्रपट पहिल्याच दिवशी कमाईचा हा आकडा गाठणार असल्याचेही बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील एक गाणे रिलीज करण्यात आले होते. हे गाणे रिलीज होताच ट्विटरवर ट्रेण्ड करीत होते. कारण या गाण्याने बाहुबलीच्या फॅन्समध्ये एकप्रकारचा जोश निर्माण केला होता. गाण्यात अमरेंद्र बाहुबली याला इंट्रोड्यूस करण्यात आले होते. चित्रपटात प्रभास अमरेंद्र बाहुबली आणि त्याचा मुलगा महेंद्र बाहुबली या दोघांची भूमिका साकारणार आहे. सध्या बाहुबलीची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू असून, प्रेक्षकांचा यास जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे.