Join us  

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हनी सिंगच्या चाहत्यांनी गोंधळ घातलाच बादशाहने मारला टोमणा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 1:31 PM

बादशाहच्या एका गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये हनी सिंगच्या चाहत्यांनी गोंधळ घातल्याचे दिसून आलं.

बॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध रॅपर म्हणून हनी सिंह व बादशाह यांचे वर्चस्व आहे. दोघांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट गाणी आणि रॅप गायली आहेत. पण, दोघांमध्ये जोरदार वाद असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्यातील शाब्दिक लढाई सुरुच आहे. त्यांच्यातील वाद फक्त दोघांमध्येच राहिला नसून बादशाह आणि हनी सिंग यांच्या चाहत्यांमध्येही दिसून येतो. नुकतेच बादशाहच्या एका गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये हनी सिंगच्या चाहत्यांनी गोंधळ घातल्याचे दिसून आलं. यानंतर बादशाहनेदेखील त्यांच्या अंदाजात हनी सिंगच्या चाहत्यांची बोलती बंद केली.

बादशाहच्या एका कॉन्सर्टमध्ये काही चाहत्यांनी मोठ्याने हनी सिंगच्या नावाने घोषणा देत धुमाकूळ घातला. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, 'बादशाह स्टेजवर असून काही चाहते यो यो हनी सिंगच्या नावानं घोषणा देत आहेत.  हनी सिंगचे नाव कानावर पडताच बादशाह भडकला. हनी सिंगच्या चाहत्याला उद्देशून तो म्हणाला, 'एक पेन और पेपर देना। गिफ्ट लाया हूं तुम्हारे लिए। कुछ लिरिक्स लिख के देता हूं। पापा का कमबैक हो जाएगा तुम्हारे। यही काम रह गया है तुम्हारा और तो पल्ले है नहीं कुछ।' (अर्थात-एक कागद आणि पेन घेऊन या तुमच्यासाठी खास गिफ्ट आहे. गाण्याच्या काही ओळी तुम्हाला लिहून देतो. एवढंच काम आता तुमच्याकडे उरलंय).

एक काळ असा होता जेव्हा यो यो हनी सिंग आणि बादशाह हे दोन चांगले मित्र मानले जात होते. हनी सिंग आणि बादशाह यांच्या मैत्रीत  2009 मध्ये दुरावा निर्माण झाला होता. या आधी दोघे खूप चांगले मित्र होते. त्यांनी मिळून माफिया मुंडेर नावाचा बँड तयार केला होता. ज्याला लोकांनी खुप पसंतही केलं होतं. ‘खोल बोतल’, ‘बेगानी नार बुरी’, ‘दिल्ली के दीवाने’ असे हिट गाणे यांच्या जोडीने दिले, जे आजही लोकप्रिय आहेत. जो 2012 मध्ये बंद झाला होता. हनी आणि बादशाह यांच्या मैत्रीत वादाची ठिणगी पडली आणि2012 मध्ये हा बँड फुटला. त्यानंतर दोघांमध्ये खुप वादही झाले.

बादशाहने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आपल्या हटके अंदाजात गाण्यांनी मोठा चाहतावर्ग जमवला आहे. तर हनी सिंग हे नाव देखील बॉलीवूड जगतात मागील अनेक वर्षांपासून गाजतंय. मध्यंतरीच्या काळात गंभीर आजारामुळे हनी सिंगने गायनातून  ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा आपल्या नवीन गाण्यासह कधी कमबॅक करणारा हे पाहण्यासाठी त्याच्या चाहतावर्ग कमालीचा उत्सुक दिसत आहे. मात्र वादानंतर दोघांची जोडी कधीच एकत्र आली नाही. 

टॅग्स :बादशहाहनी सिंहसेलिब्रिटीबॉलिवूड