Join us  

‘बदला’ने घेतला ‘कॅप्टन मार्वल’चा बदला! दुसऱ्या आठवड्यात कमावले इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 3:42 PM

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या ‘बदला’ या चित्रपटाने अखेर ‘बदला’ घेतलाच. होय, गत आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटासोबत ‘कॅप्टन मार्वल’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला होता. साहजिकच बॉक्स आॅफिसवर ‘बदला’ विरूद्ध ‘कॅप्टन मार्वल’ असा थेट सामना रंगला होता.

ठळक मुद्दे‘बदला’ हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते ? याची ही कथा आहे.

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्याबदला’ या चित्रपटाने अखेर ‘बदला’ घेतलाच. होय, गत आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटासोबत ‘कॅप्टन मार्वल’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला होता. साहजिकच बॉक्स आॅफिसवर ‘बदला’ विरूद्ध ‘कॅप्टन मार्वल’ असा थेट सामना रंगला होता. पहिल्या आठवड्यात या सामन्यात ‘कॅप्टन मार्वल’ने बाजी मारली. पण दुसऱ्या वीकेंडमध्ये मात्र ‘बदला’ने ‘कॅप्टन मार्वल’ला चीत करत, आपला ‘बदला’घेतलाच.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, अमिताभ व तापसी स्टारर ‘बदला’ने ‘कॅप्टन मार्वल’ला पछाडत दुस-या आठवड्यात १८.७० कोटींची कमाई केली. दुसºया आठवड्यात शुक्रवारी ‘बदला’ने ४.०५ कोटींची कमाई केली. शनिवारी ६.६० कोटी तर रविवारी ८.०५ कोटींचा बिझनेस केला. याचसोबत ‘बदला’ची एकूण कमाई ५६.७० कोटींच्या घरात पोहोचली.

‘कॅप्टन मार्वल’चे म्हणाल तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटात ५६.२५ कोटींची बक्कळ कमाई केली. पण दुसºया आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत घट दिसली. शुक्रवारी या हॉलिवूडपटाने ३ कोटी कमावले आणि शनिवारी ५ कोटींचा गल्ला जमवला. ‘कॅप्टन मार्वल’ या चित्रपटात ब्री लार्सन सुपरवूमन अवतारात आहे. हिंदीशिवाय तेलगू व तामिळ भाषेत हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे.‘बदला’ हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. एका खूनाच्या आरोपात तापसी अडकते. यातून ती बाहेर कशी येते ? वकीलाच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन तापसीला यातून बाहेर कसे काढतात? ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते ? याची ही कथा आहे.

टॅग्स :बदलातापसी पन्नूअमिताभ बच्चन