Join us
Daily Top 2Weekly Top 5

इरफान खान यांच्या हातात गांजा आहे का, असे नेटिझन्सने विचारताच मुलाने दिले सडेतोड उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 19:55 IST

या फोटोत इरफान सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या हातात आपल्याला सिगारेट पाहायला मिळत आहे तर त्यांचा मुलगा त्यांच्या बाजूला बसलेला आहे. या फोटोवरून नेटिझन्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

ठळक मुद्देबाबीलने शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट देताना एका युझरने इरफान यांच्या हातात जॉइन्ट अर्थात गांजा आहे का असे विचारले आहे. त्यावर लगेचच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

दिवंगत अभिनेता इरफान खानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याच फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो त्यांचा मुलगा बाबीलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत इरफान सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या हातात आपल्याला सिगारेट पाहायला मिळत आहे तर त्यांचा मुलगा त्यांच्या बाजूला बसलेला आहे. या फोटोवरून नेटिझन्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

बाबीलने शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट देताना एका युझरने इरफान यांच्या हातात जॉइन्ट अर्थात गांजा आहे का असे विचारले आहे. त्यावर लगेचच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. इरफान खरंच गांजा ओढत होते का अशी चर्चा नेटिझन्स करत आहेत. त्यामुळे  बाबीलने उत्तर देत सगळ्यांची बोलती बंद केली आहे. त्याने त्या नेटिझन्सला उत्तर देताना लिहिले आहे की, 'मला नाही माहीत तुम्हाला गांजा कुठे दिसला. पण तुमची अशीच इच्छा असेल तर तुम्हाला शुभेच्छा. इथे कोणताही गांजा नाहीये...

बाबीलने इरफानचे तीन फोटो शेअर केले असून त्यासोबत लिहिले आहे की, 'मी एवढी मेहनत करत आहे. पण याची साक्ष म्हणून तुम्ही आज असायला हवे होते.' त्याने शेअर केलेल्या एका फोटोत आपल्याला अनुराग कश्यप आणि इरफान यांना पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोत इरफान बछड्यासोबत खेळताना दिसत आहेत. 

टॅग्स :इरफान खान