Join us  

'बाहुबली' फेम प्रभास चाहत्यांना देणार व्हॅलेंटाइन डेचं गिफ्ट, इंस्टाग्रामवर केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 6:34 PM

अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट 'राधे श्याम'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत

बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट 'राधे श्याम'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. २०१८ मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रभासने नुकतेच इंस्टाग्रामवर चित्रपटाशी निगडीत एक पोस्ट शेअर केली आहे. १४ फेब्रुवारीला चित्रपटाची एक झलक चाहत्यांना पहायला मिळणार आहे. 

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा शॉर्ट प्री टीझर रिलीज झाला होता. टीझरची सुरूवात प्रभासच्या बाहुबली लूकपासून झाली होती. त्यानंतर 'साहो' चित्रपटाचा एक सीन ज्यामध्ये प्रभास रस्त्यावर फिरताना दिसत होता. या चित्रपटाचे शॉर्ट प्री टीझर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले होते की, संपूर्ण टीझर १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे संगीत जस्टिन प्रभाकरण यांनी केले आहे.

प्रभासचा ‘राधेश्याम’ हा आगामी सिनेमा युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करत आहेत. या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अभिनेत्री पूजा हेगडेची वर्णी लागली आहे. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होणार आहे. प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

राधेश्याम चित्रपटाशिवाय प्रभास आदिपुरूष चित्रपटात झळकणार आहे. हा बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटाचे बजेट ४०० कोटी रुपये आहे. ओम राऊतच्या या चित्रपटात प्रभास राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सलार या चित्रपटातही तो दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक नुकताच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात प्रभास अॅक्शन करताना दिसणार आहे.

टॅग्स :प्रभाससैफ अली खान