azaan issue : फतवा काढणा-यांवर सरकारने कारवाई करावी ; सोनू निगमची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 12:03 IST
मशिदीच्या भोंग्यांवरून होणा-या अजानबाबत ट्विट करून वादात अडकलेला आलेल्या गायक सोनू निगमने याप्रकरणी फतवा ...
azaan issue : फतवा काढणा-यांवर सरकारने कारवाई करावी ; सोनू निगमची मागणी
मशिदीच्या भोंग्यांवरून होणा-या अजानबाबत ट्विट करून वादात अडकलेला आलेल्या गायक सोनू निगमने याप्रकरणी फतवा काढणा-यांविरोधात कारवाई करण्याची मागणी पुढे रेटली आहे.कोलकात्यातील एका मौलवीने सोनूविरोधात फतवा जारी केला होता. सोनू निगमचे शिर कापणाºयास ५१ कोटी रुपए दिले जातील, असा फतवा त्याने काढला होता. याशिवाय सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणा-याला १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सोनू निगमने आपला मित्र हकिम आलीम याच्याकडून आपले केस कापून घेत, मुस्लीम नेते सय्यद कादरी यांना जशास तसे उत्तर देत, कादरी यांनी आता दहा लाख रुपये तयार ठेवावेत, असे आवाहन केले होते. मात्र सोनूचे मुंडन करून त्याला जुन्या चपलांचा हार घालून रस्त्यांवरून फिरविणाºयांना दहा लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे मी म्हटले होते, असे सांगून कादरी यांनी १० लाख रुपए देण्यास नकार दिला होता. या संपूर्ण पार्श्वभूमीवर सोनूने ही मागणी केली आहे.मी कोणाचाही बाजू घेऊन बोलत नाही, ही मानसिकता मला आवडत नाही.कोणीही काहीही बोलतो,याचे केस कापा,त्याचा खून करा, मी सर्व गोष्टींबाबत बोलतो. मला गुंडगिरी आवडत नाही.या देशात असे व्हायला नको. सरकारने असे फतवे काढणा-यांवर कारवाई करायला हवी. असे एका खासगी वाहिनीवर बोलताना सोनू म्हणाला. लोकशाही असलेल्या आणि एका सभ्य म्हणवल्या जाणाºया देशात आपण राहतो. अशा देशात फतवा सारख्या गोष्टींना परवानगी कशी काय असू शकते? असा प्रश्नही सोनूने यावेळी विचारला.ALSO READ : मौलवीच्या फतव्याला सोनू निगमचे उत्तर; मुस्लिम मित्राकडून केले मुंडण!! ‘मी मुस्लीम नाही, तरीही रोज सकाळी अजानमुळे माझी झोपमोड का? ही बळजबरी कधी थांबणार?’ असा सवाल सोनू निगमने ट्विटरवर केला होता. इस्लामची सुरुवात झाली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?, जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाºया कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही, असे आणखी एक ट्विटही त्याने केले होते. त्याच्या या ट्विटवरूनच मोठे वादंग माजले होते.