Join us  

TIME मॅगझीनच्या मंचावर आयुष्मान खुरानाने वाचला गीतेचा श्लोक, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 8:20 PM

आयुष्मान खुरानाला सिंगापूरमध्ये 'टाइम 100 इम्पॅक्ट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

'ड्रीम गर्ल 2'च्या यशानंतर अभिनेता आयुष्मान खुरानाला सेलिब्रेशन करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. आयुष्मान खुरानाला सिंगापूरमध्ये 'टाइम 100 इम्पॅक्ट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयुष्मानने मनोगतही व्यक्त केले. विशेष म्हमजे, आयुष्मानने आपल्या मनोगताची सुरुवात भगवद्गीतेतील एका श्लोकाने केली.

आयुष्मानने आपल्या भाषणाची सुरुवात करताना म्हटले, "सर्वांना शुभ संध्याकाळ. मला भारतीय धर्मग्रंथ, भगवद्गीतेतील एक श्लोक म्हणायचा आहे. हा संस्कृतमध्ये आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते, मा फलेषु कदाचना, मा कर्मफलाहेतुर भूर्मा, ते सङ्गो स्त्वकर्मणि | हा श्लोक निःस्वार्थ कृतीचे सार स्पष्ट करतो. हा तुम्हाला प्रक्रियेवर प्रेम करायला शिकवते, परिणामावर नाही."

आयुष्मान पुढे म्हणाला, "मी या जागतिक व्यासपीठावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा विचारही केला नव्हता. मी फक्त एक कलाकार म्हणून माझे काम करत होतो. मी इमानदारीने अशा कथा निवडतो, ज्या समाजात सामाजिक बदल घडवून आणू शकतात. टाईम मॅगझिनद्वारे कलाकार म्हणून ओळख मिळणे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे."

या कार्यक्रमाची झलक त्याने आपल्या चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत आयुष्मान लिहितो, "एक माणूस आणि कलाकार म्हणून माझा उद्देश ओळखल्याबद्दल 'टाइम'चे आभार! या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल मी खूप आभारी आहे.” दरम्यान, आयुष्मान खुराना, हा या वर्षीच्‍या टाईम 100 इम्‍पॅक्ट अवॉर्ड्समध्‍ये सन्मानित झालेला एकमेव भारतीय आहे.

टॅग्स :आयुषमान खुराणाबॉलिवूड