Join us

आयुषमान खुराणाने केली 'थामा'च्या शूटिंगला सुरुवात, दिनेश विजान म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 16:17 IST

Aayushman Khurana Upcoming Movie Thama : आयुषमान खुराणाने 'थामा'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या खास प्रसंगी निर्माते दिनेश विजान यांनी अभिनेत्यासाठी एक पत्र पाठवले आहे.

मॅडॉक फिल्म्सने नुकतीच त्यांच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील पुढील धमाकेदार चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'थामा' (Thama Movie). ही रक्तरंजित प्रेमकथा आहे, ज्यामध्ये आयुषमान खुराणा (Aayushman Khurana) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुषमान आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. दरम्यान आजपासून आयुषमानने थामाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

आयुषमान खुराणाने 'थामा'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या खास प्रसंगी निर्माते दिनेश विजान यांनी अभिनेत्यासाठी एक पत्र पाठवले, ज्यात लिहिले आहे की, “मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समध्ये तुझे स्वागत आहे. ‘अनडेड’ थामा साकारण्यासाठी आयुष्मानपेक्षा चांगला अभिनेता असूच शकत नाही! आम्हाला खात्री आहे की तुला या भूमिकेत काम करताना खूप मजा येईल.”

रश्मिका सिनेमाबद्दल म्हणाली...थामा सिनेमाबद्दल रश्मिका मंदाना म्हणाली की, हे अविश्वसनीय असणार आहे. मी उडताना दिसणार आहे. मी खूप उत्साहित आहे." अभिनेत्रीने चित्रपटासाठी तयार केल्या जाणाऱ्या कल्पनारम्य जगाबद्दल तिचे आकर्षण व्यक्त केले आणि म्हटले, "तुमच्याकडे गुप्तचर विश्व आहे, तुमच्याकडे ते सर्व आहे. पण या वेगळ्याच विश्वाने मला भुरळ घातली आहे. सर्वकाही मुळापासून तयार करत आहेत. ते गोष्टींची कल्पना करत आहेत, लोकांना विश्वास देतात की त्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकतात."

'थामा'  दिवाळी २०२५ मध्ये होणार रिलीज

'थामा' एक रोमांचक प्रेमकथा सादर करणार आहे, जिथे प्रेम आणि रक्तरंजित थरार एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळी २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुषमान खुराणा आणि रश्मिका मंदानासोबत परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसारखे प्रतिभावान कलाकारही या चित्रपटाचा भाग असतील. ब्लॉकबस्टर ‘मुंज्या’ फेम दिग्दर्शक आदित्य सर्पोतदार हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. कथा निरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फुलारा यांनी लिहिली आहे, तर दिनेश विजान आणि अमर कौशिक या चित्रपटाचे निर्माते आहेत.

टॅग्स :आयुषमान खुराणारश्मिका मंदाना