Join us

​ ‘लव्हरात्री’मध्ये दिसणार ‘भाईजान’चा मेहुणा आयुष शर्मा! सलमान खानने केली घोषणा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 14:15 IST

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याच्या बॉलिवूड डेब्यूचे संकेत फार पूर्वीच मिळाले होते. याची अधिकृत घोषणा तेवढी व्हायची होती. ...

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याच्या बॉलिवूड डेब्यूचे संकेत फार पूर्वीच मिळाले होते. याची अधिकृत घोषणा तेवढी व्हायची होती. आज अखेर ती अधिकृत घोषणाही झाली. होय, सलमान खानने आज आपल्या टिष्ट्वटर हँडलवरून याबाबतची घोषणा केली.  एसके फिल्म्स प्रॉडक्शनचा पाचवा चित्रपट ‘लव्हरात्री’मधून आयुष शर्मा दिसणार, हे जाहिर करताना आनंद होतोय, असे सलमानने लिहिले आहे. आयुषचा हा चित्रपट अभिराज मिनावाला दिग्दर्शित करणार असल्याची माहितीही सलमानने दिली आहे.यापूर्वी अलीकडे एका इव्हेंटमध्ये आयुषला लॉन्च करत असल्याच्या वृत्ताला सलमानने दुजोरा दिला होता. होय, आम्ही आयुष शर्माचा डेब्यू चित्रपट प्रोड्यूस करतोय. येत्या फेबु्रवारीपासून याचे शूटींग सुरु होईल. २०१८ च्या अखेरिस हा चित्रपट रिलीज होईल, असे सलमानने सांगितले होते.ALSO READ : आयुष शर्माने ‘या’ अभिनेत्रीशी रोमान्स करण्यास दिला नकार; सलमान खानची वाढली डोकेदुखी!आयुष शर्मा हा भाईजान सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा पती आहे. अर्पिताच्या लग्नापासून आयुषच्या बॉलिवूड डेब्यूबाबत बातम्या येत होत्या. पण कदाचित मधल्या काळात सलमानने मेहुण्याचा डेब्यू तितका मनावर घेतला नव्हता. पण मग अर्पिता नाराज झाली. आपला भाऊ आपल्या पतीला लॉन्च करण्यास टाळाटाळ करतोय, असा तिचा समज झाला. मग कुठे सलमान खाडकन जागा झाला आणि कामाला लागला.  आता तर सलमानने बहिणीला दिलेले वचन पाळले, असे म्हणावे लागेल. मध्यंतरी आयुष शर्मा सलमानच्या ‘ट्युबलाईट’मधून डेब्यू करणार अशी खबर होती. पण ही बातमी निव्वळ अफवा ठरली. मग धर्मा प्रॉडक्शनच्या ‘रात बाकी’मधून आयुष डेब्यू करणार, अशीही बातमी आली. या चित्रपटात आयुषच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार, इथपर्यंत सांगितले गेले. पण ती सुद्धा अफवाच निघाली. आता मात्र आयुषच्या डेब्यूची अधिकृत घोषणा झालीय. यानंतरच्या काळात आयुष भाईजानच्या अपेक्षांवर कितर खरा उतरतो, केवळ हेच बघायचेय.तूर्तास ‘लव्हरात्री’ची हिरोईन ठरलेली नाही. या चित्रपटात आयुषच्या अपोझिट कुणाची वर्णी लागते, ते बघणेही इंटरेस्टिंग ठरणार आहे.