Join us  

अदा शर्माने मैत्रिणीसोबत केली भयानक मस्करी, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 9:06 AM

अभिनेत्री अदा शर्माचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत मस्करी करताना दिसत आहे.

बॉलिवूडबरोबर साऊथ चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणारी अभिनेत्री अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असल्याचे दिसत आहे. ती सातत्याने तिचे व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करीत असते. अशात तिने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणीसोबत प्रॅँक (मस्करी) करताना दिसत आहे. हा सर्व प्रसंग तिने कॅमेºयात शूट करून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये अदा शर्मा तिच्या एका मैत्रिणीला फोटो काढण्यासाठी वेगवेगळ्या पोज देण्यास सांगणे. त्यानंतर सर्व मैत्रिणीसोबत ग्रुप सेल्फीची डिमांड करते. मात्र याचदरम्यान, ती मैत्रिणीला असे काही घाबरून देते की, तिचा एकच गोंधळ उडतो. ग्रुप सेल्फी घेताना अदा आपल्या हातात आर्टिफिशियल स्पायडर घेऊन येते. जेव्हा सर्व मैत्रिणी सेल्फीसाठी पोज देतात तेव्हा अदा हळूच ती स्पायडर तिच्या मैत्रिणीच्या मानेवर सोडते. मात्र यामुळे तिची मैत्रीण अशी काही घाबरते की, जोरजोरात ओरडण्यास सुरुवात करते. चेष्टा-मस्करीत सुरू असलेला हा प्रकार मैत्रिणीसाठी मात्र चांगलाच भीतीदायक ठरतो. मैत्रिणीची झालेली गफलत बघून मात्र अदा आणि तिच्या मैत्रिणींमध्ये चांगलाच हशा पिकतो. दरम्यान, अदा शर्मा ‘१९२०’ आणि ‘कमांडो-२’ यासारख्या चित्रपटात बघावयास मिळाली आहे. तिने २००८ मध्ये आलेल्या ‘१९२०’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्याचबरोबर तिने ‘हम हैं राही कार के’ आणि ‘हंसी तो फंसी’ यासारख्या चित्रपटांतही काम केले आहे. मात्र तिचे हे चित्रपट फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. परंतु विद्युत जामवालसोबत ‘कमांडो-२’मध्ये तिच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा करण्यात आली. चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला.