Join us

वजन घटवण्यासाठी साखर टाळा - कॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:50 IST

आदित्य रॉय कपूर आणि कॅटरिना कैफ हे दोघेही त्यांचा चित्रपट ‘फितूर’ मुळे खुप चर्चेत आहेत. या चित्रपटासाठी दोघांनीही अत्यंत ...

आदित्य रॉय कपूर आणि कॅटरिना कैफ हे दोघेही त्यांचा चित्रपट ‘फितूर’ मुळे खुप चर्चेत आहेत. या चित्रपटासाठी दोघांनीही अत्यंत मेहनत घेतली आहे. कॅटरिनाने तर तिचे वजनही बरेच घटवले आहे. ती म्हणते,‘ वजन कमी करायचे असेल तर गहू, साखर आणि डेअर प्रोडक्ट टाळलेच पाहिजेत. अन्यथा मग तुमचे वाढलेले वजन तुमच्या ताब्यात राहत नाही. आदित्य रॉय कपूर हा तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या नियम आणि खानपानावर जास्त फिदा आहे. ‘एम बोले तो’ शो मध्ये आदित्यला विचारण्यात आले की, तुझ्या या हॉट बॉडीचे रहस्य काय ? तर तो म्हणाला,‘ दिन मैं दो बार वर्कआऊट था, युज टू हॅव लॉट्स आॅफ वॉटर, लॉर्टस आॅफ व्हेरी बोअरिंग फूड, यूज टू ईट अ लॉट बट बहोत बोअरिंग खाना.’ कॅट म्हणते,‘ मी रोज अंडे आणि मफिन्स यांनी बनलेले ओट्स खाते. त्यामुळे महिलांनी तरी वजन घटवण्यासाठी साखर, डेअरी प्रोडक्ट्स खाणे बंद करावेत.’