बॉलिवूडचे दिग्गज कॉमेडियन आणि अभिनेते असरानी यांचं २० ऑक्टोबर रोजी निधन झालं. असरानी यांनी मुंबईतील आरोग्य निधी रुग्णालयात वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. असरानी त्यांच्या मागे किती संपत्ती सोडून गेले आणि ते किती शिकलेले होते, हे जाणून घेऊयात.
असरानी यांचा जन्म राजस्थानमधील जयपूर येथील एका सिंधी हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांनी सेंट झेवियर्स स्कूलमधून मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी जयपूरमधील राजस्थान कॉलेजमधून पदवी मिळवली होती. असरानी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. म्हणूनच त्यांनी आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी जयपूरमध्ये ऑल इंडिया रेडिओ जॉईन केले, जिथे ते व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम करत राहिले. असरानी एक कॉमेडियन आणि अभिनेते असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माते देखील होते. त्यांनी आपल्या आयुष्यात प्रसिद्धीसोबतच पैसेही कमावले. मुंबईत असरानी यांचे स्वतःचे घर आहे. याव्यतिरिक्त, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ४८ कोटी रुपये होती, जी ते त्यांच्या कुटुंबासाठी सोडून गेले आहेत.
असरानी यांची चित्रपट कारकीर्दअसरानी यांनी १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हरी कांच की चूड़ियां' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांच्या ५८ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 'शोले'मधील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय, 'अभिमान', 'चुपके-चुपके', 'छोटी सी बात' आणि 'भूल भुलैया' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
अक्षय कुमारच्या सिनेमात झळकणार होते असरानी असरानी प्रियदर्शन यांच्या 'हैवान' चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खानसोबत दिसणार होते. त्यांनी याच वर्षी ऑगस्टमध्ये बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. असरानी म्हणाले होते की, ''आता शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होत आहे. चित्रपटाचे नाव 'हैवान' आहे. प्रियदर्शन हे दिग्दर्शक आहेत.''
Web Summary : Veteran comedian Asrani passed away at 84, leaving behind a notable legacy. Educated in Jaipur, he financed his studies through All India Radio. With over 350 films, including iconic roles in 'Sholay', Asrani amassed a reported net worth of ₹48 crore, which he leaves to his family.
Web Summary : दिग्गज हास्य अभिनेता असरानी का 84 वर्ष की आयु में निधन हो गया, वे एक उल्लेखनीय विरासत छोड़ गए। जयपुर में शिक्षित, उन्होंने ऑल इंडिया रेडियो के माध्यम से अपनी पढ़ाई को वित्त पोषित किया। 'शोले' में प्रतिष्ठित भूमिकाओं सहित 350 से अधिक फिल्मों के साथ, असरानी ने ₹48 करोड़ की संपत्ति अर्जित की, जो वह अपने परिवार के लिए छोड़ गए हैं।