आशा भोसले यांनी घेतली अनू मलिकची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 14:52 IST
गायिका आशा भोसले आणि संगीतकार अनू मलिक बेगम जान या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. या चित्रपटात विद्या बालन ...
आशा भोसले यांनी घेतली अनू मलिकची भेट
गायिका आशा भोसले आणि संगीतकार अनू मलिक बेगम जान या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. या चित्रपटात विद्या बालन प्रमुख भूमिका साकारत आहे. स्वांतत्र्यापूर्वीचा काळ प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. श्रीजीत मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. मुखर्जी हे बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्यांना त्यांच्या दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्करही मिळालेला आहे. फाळणीच्यावेळी आपल्या कुटुंबियांपासून वेगळ्या झालेल्या एका स्त्रीच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. जवळजवळ एका शतकानंतर अनू आणि आशा एकत्र येणार आहेत. सध्या अनू मलिक आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. या चित्रपटाच्या गाण्याबाबत चर्चा करण्यासाठी आशा भोसले यांनी अनू मलिक यांची नुकतीच हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.