Join us

शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 09:10 IST

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतोय. आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या शोचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतोय. आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या शोचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी आर्यन खानने पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर त्याचं मनोगत व्यक्त केलं. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' च्या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आले आहेत.  इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन आर्यन खानचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तो म्हणतो- "आज मी खूप नर्व्हस आहे. कारण आज मी पहिल्यांदाच तुम्हा सगळ्यांसमोर स्टेजवर उभा आहे. आणि म्हणूनच गेले २ दिवस आणि ३ रात्र मी या भाषणाची प्रॅक्टिस करत होतो. मी इतका नर्व्हस आहे की मी टेलिप्रॉम्प्टवरही भाषण लिहून घेतलंय. जर समजा लाइट गेली तर मी चिठ्ठीवरही भाषण लिहून आणलंय. आणि जर तरीही माझ्याकडून काही चूक झालीच तर पापा है ना... आणि या सगळ्यानंतरही जर माझ्याकडून चूक झालीच तर प्लीज मला माफ करा. कारण, ही माझी पहिलीच वेळ आहे". 

आर्यनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आणि त्याला प्रेक्षकांचं प्रेमही मिळत आहे. आर्यन हा शाहरुखची कॉपी असल्याचं चाहते म्हणत आहेत. आर्यनचा लूक तर शाहरुखसारखा आहेच. पण, त्याचा आवाजही हुबेहुब शाहरुख खानसारखाच आहे. त्यामुळे चाहते त्याचं कौतुक करत आहेत. आर्यनचा 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' हा शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आर्यनने या शोचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या १८ सप्टेंबरला हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खानआर्यन खानसेलिब्रिटी