Join us

‘मेरी प्यारी बिंदू’च्या कलाकारांची धम्माल मस्ती...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

‘नच बलिये सीजन ८’ या शोवर ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाची टीम आली होती. अभिनेता आयुषमान खुराना, परिणीती चोप्रा यांनी अनेक धमाकेदार गाण्यांवर डान्स सादर केला.

‘नच बलिये सीजन ८’ या शोवर ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाची टीम आली होती. अभिनेता आयुषमान खुराना, परिणीती चोप्रा यांनी अनेक धमाकेदार गाण्यांवर डान्स सादर केला. ‘नच बलिये’ या शोवर आल्यानंतर सोनाक्षी सिन्हासोबतही चित्रपटाच्या संदर्भात आयुषमान आणि परिणीती यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.नच बलियेच्या संपूर्ण टीमसोबत आयुषमान-परिणीतीने फोटोसेशन केले. त्यावेळी सर्वजण असेच अगदी खुश दिसत होते.ब्राऊन रंगाचा लाँग स्कर्ट घातलेली सोनाक्षी सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेत होती. तिची ही हॉट अदा पाहिल्यावर कुणीही तिच्या प्रेमात पडेल.‘ढिशूम’ चित्रपटानंतर परिणीती चोप्राने तिचे वजन घटवले. त्यानंतर ती एवढी हॉट दिसू लागली की, तिची ही अदा अगदीच मिस करता येण्यासारखी नाही.सोनाक्षीचा सुपर हॉट अंदाज तुम्ही पाहिलाय का? नाही ना. मग पाहा ती या स्लिव्हलेस ब्राऊनीश स्कर्टमध्ये किती क्यूट दिसते आहे ते!परिणीती आणि फोटो हे एक अतूट नाते आहे. फोटोग्राफर्सना पाहिलं की, परिणीतीने अशी स्टायलिश पोझ दिली.स्टायलिश सोनाक्षीसोबत फोटो काढायला कुणाला आवडणार नाही? सेटवर तिला पाहताच एका लहानग्या मुलीला सोनासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.आयुषमान खुराना हा पांढऱ्या रंगाचा कोट आणि कुर्त्यामध्ये केवढा हँण्डसम दिसतो आहे! पाहिलंत का? त्याचा हा अंदाज पाहून कुणीही त्याच्या प्रेमात पडणार...चित्रपटात परिणीती चोप्राला गायिका व्हायचे असते. त्यामुळे हे तिचे स्वप्न ती सेटवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे. तिने नच बलियेच्या सेटवर धमाकेदार गाण्याचे सादरीकरण करून तिच्यातील टॅलेंट दाखवून दिले.चित्रपटातील गाण्यांवर धमाकेदार डान्स यावेळी सर्व कलाकारांनी सादर केला. स्पर्धकांप्रमाणेच यावेळी सेटवर मेरी प्यारी बिंदूच्या कलाकारांनी मस्त धम्माल केली.