Join us  

उद्धव ठाकरेंचं अर्शद वारसीने केलं कौतुक, कोरोना, चक्रीवादळ अशा संकटांचा निडरपणे मुकाबला करणारे एकमेव मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 3:12 PM

अर्शद वारसीने सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

ठळक मुद्देअर्शद वारसीने ट्वीट केले आहे की, मला वाटत नाही की, आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याने त्यांच्या कार्यकालावधीच्या सुरुवातीला इतक्या संकटांचा सामना केला नसेल.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महाराष्ट्रात तर कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या संख्येत असून सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबई आणि पुणे या महानगरात आहेत. पण असे असले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रिमंडळ अतिशय मेहनत घेत असून या संकटाचा सामना करत आहेत. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या या कार्यासाठी सामान्य लोकांपासून सगळेच सेलिब्रेटी त्यांचे कौतुक करत आहेत. आता तर महाराष्ट्रात चक्रीवादळ धडकले असून या वादळात कशाप्रकारे लोकांनी आपली काळजी घ्यायची हे सांगण्यासाठी काल उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधला. याच पार्श्वभूमीवर अभिनेता अर्शद वारसीने सोशल मीडियाद्वारे उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

अर्शद वारसीने ट्वीट केले आहे की, मला वाटत नाही की, आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याने त्यांच्या कार्यकालावधीच्या सुरुवातीला इतक्या संकटांचा सामना केला नसेल. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसांत त्यांना कोरोनासारख्या संकटाचा सामना करावा लागला. सध्या मुंबई एका प्राणघातक विषाणूच्या विळख्यात अडकली आहे आणि आता हे चक्रीवादळ...

अर्शद वारसीचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून अर्शदच्या मताशी आम्ही देखील सहमत आहोत असे अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. 

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीला नुकतेच धडकलं असून ताशी १०० किलोमीटरहून अधिक वेगानं चक्रीवादळानं रायगडमधल्या अलिबाग, श्रीवर्धनला धडक दिली. या भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांतील घरांचे पत्रे उडून गेले आहेत. थोड्याच वेळात चक्रीवादळ मुंबई, ठाण्याला धडक देण्याची शक्यता आहे. मुंबईतही पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडल्यानं वाहनांचं, घरांचं, दुकानांचं नुकसान झालं आहे. चक्रीवादळाचा वेग आणि त्याचा प्रभाव पाहता पुढील काही तास अतिशय महत्त्वाचे आहेत.

टॅग्स :अर्शद वारसीउद्धव ठाकरे