‘बहन होगी तेरी’च्या दिग्दर्शक व निर्मात्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 13:21 IST
राजकुमार राव आणि श्रुती हासन या दोघांचा आगामी सिनेमा ‘बहन होगी तेरी’ काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. रिलीज डेट ...
‘बहन होगी तेरी’च्या दिग्दर्शक व निर्मात्यास अटक
राजकुमार राव आणि श्रुती हासन या दोघांचा आगामी सिनेमा ‘बहन होगी तेरी’ काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. रिलीज डेट बदलल्यामुळे चित्रपटाची चर्चा झाली होती. पण आता चर्चेपलीकडची एक बातमी आहे. ती सुद्धा धक्कादायक़ होय, ‘बहन होगी तेरी’चे दिग्दर्शक व निर्मात्यांना पोलिसांनी अटक केली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुरुवारी पोलिसांनी दिग्दर्शक अजय कुमार पन्नालाल व निर्माता टोनी डी-सूजा या दोघांना मुंबईत अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जालंधर पोलिस या दोघांच्या नावांचा अरेस्ट वॉरंट घेऊन मुंबईला पोहोचले. पोलिसांनी मेडिकल टेस्ट केल्यानंतर या दोघांना आपल्या ताब्यात घेतले.हा सगळा वाद, गत ४ एप्रिलला रिलीज झालेल्या चित्रपटाच्या एका पोस्टरसोबत सुरु झाला. या पोस्टरमध्ये चित्रपटाचा हिरो राजकुमार राव भगवान शिवाच्या वेशात दिसतो आहे. उत्तर प्रदेशाची लंबर प्लेट असलेल्या एका मोटरसायकलवर तो बसलेला आहे. हे पोस्टर हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याचे तक्रारीत म्हटले गेले आहे.‘बहन होगी तेरी’ या चित्रपटात राजकुमार राव गट्टू नामक भूमिका साकारतो आहे. जो बहुरूप्याचे काम करत असतो. यात गट्टू भगवान शिवाची भूमिका साकारत असतो. या चित्रपटात राजकुमार राव, श्रुती हासन यांच्याशिवाय गौतम गुलाटी, गुलशन ग्रोवर व रंजीत यांच्या मुख्य भूमिका आहेत. आधी हा सिनेमा २ जून रोजी रिलीज होणार होता. पण यानंतर ही तारिख ९ जूनपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. हा चित्रपट एक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आहे. याात राजकुमार राव व श्रुती हासन यांची जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसेल. लखनौच्या एका प्रेमी युगुलाची कथा यात दिसणार आहे.