Join us  

जगभरातील 'या' चित्रपटांचा जबरदस्त रेकॉर्ड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 2:00 PM

देश-विदेशात प्रत्येकवर्षी बरेच बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड चित्रपट रिलीज होतात. त्यात असे काही चित्रपट आहेत जे कायमस्वरुपी स्मरणात राहतात तर काही असे रेकॉर्ड बनवतात ज्याला तोडणे जवळपास अशक्यच असते. आज आपण अशाच काही चित्रपटांविषयी जाणून घेऊया ज्यांनी अद्भुत रेकॉर्ड्स बनविले ज्यांना तोडणे खूपच कठीण आहे.

-रवींद्र मोरेदेश-विदेशात प्रत्येकवर्षी बरेच बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड चित्रपट रिलीज होतात. त्यात असे काही चित्रपट आहेत जे कायमस्वरुपी स्मरणात राहतात तर काही असे रेकॉर्ड बनवतात ज्याला तोडणे जवळपास अशक्यच असते. आज आपण अशाच काही चित्रपटांविषयी जाणून घेऊया ज्यांनी अद्भुत रेकॉर्ड्स बनविले ज्यांना तोडणे खूपच कठीण आहे.* सर्वात जास्त जिंकले अवॉर्डबेन हर (१९६०), टायटॅनिक (१९९९), लॉर्ड ऑफ द रिंग्स, द रिटर्न ऑफ द किंग (२००४) या सर्व चित्रपटांना ११ अवॉर्ड मिळाले आहेत. आतापर्यंत फक्त या चारच चित्रपट असे आहेत ज्यांना सर्वात जास्त आॅस्कर अवॉर्ड मिळाले आहेत. या रेकॉर्डला तोडणे किती कठीण आहे, हे आपणास माहित असेल.* अवतारअवतार चित्रपटाने यशस्वीते चे सर्व रेकॉर्ड तोडत १८०५१.९३ कोटी रुपयांची कमाई केली आणि जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाचा गौरव मिळविला. या चित्रपटास जेम्स कॅमरनने डायरेक्ट केले आहे. ग्राफिक्सचा अत्यंत प्रभावी वापर व त्रिमिती चित्रीकरण हे या चित्रपटाचे खास वैशिट्य आहे.* पायरेट्स ऑफ द कॅरेबियनहा जगातील सर्वात महागडा चित्रपट असून याला बनविण्यासाठी सुमारे २ हजार ४६८ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. आतापर्यंत या रेकॉर्डला बनून ८ वर्ष झाले आहेत, मात्र हा रेकॉर्ड आतापर्यंत कोणताही चित्रपट तोडू शकला नाही. या चित्रपटास सुमारे ४ हजार ३०० थिएटर्समध्ये एकाच वेळी रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटात कॉस्ट्यूम आणि लोकेशनवर खूपच खर्च करण्यात आला होता.* बाहुबली 2बाहुबली 2 ने भारतात फक्त २१ दिवसातच १ हजार कोटीची कमाई केली होती. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात असे कधी घडलेच नव्हते. भारतात कोणत्याही चित्रपटाने १ हजार रुपयाचे कलेक्शन एवढ्या कमी दिवसात केले नाही आहे. बाहुबलीच्या पहिल्या भागातील अर्धवट राहिलेले कोडं अर्थात ‘बाहुबलीला कटप्पाने का मारले..?’ हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी बाहुबली 2 ने रेकॉर्डब्रेक कमाई केली.* द 13 वॉरियरहा चित्रपट जगातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट आहे. या चित्रपटाचा बजेट १६० कोटी होता, मात्र हा चित्रपट फक्त ६० कोटीच कमाई करु शकला होता. हे रेकॉर्ड कोणी मुद्दामही तोडू इच्छित नसेल आणि जर कळत-नकळत जरी या हे रेकॉर्ड तुटले तर त्याला खूपच मोठे नुकसान सहन करावे लागेल.

टॅग्स :बॉलिवूडहॉलिवूड