हर्षालीसोबत अर्जुनचा सेल्फी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 21:16 IST
‘बजरंगी भाईजान’ मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केलेल्या हर्षाली मल्होत्राने खरंच सर्वांच्या हृदयावर राज्य करायला सुरूवात केली आहे. एवढ्या लहान वयात ...
हर्षालीसोबत अर्जुनचा सेल्फी !
‘बजरंगी भाईजान’ मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केलेल्या हर्षाली मल्होत्राने खरंच सर्वांच्या हृदयावर राज्य करायला सुरूवात केली आहे. एवढ्या लहान वयात अभिनयाची उत्तम जाण असलेल्या तिने स्वत:ची एक जागा निर्माण केली आहे. त्यामुळे बॉलीवूडमधील इतर कलाकारही तिच्यासोबत फोटो काढण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. ‘की अॅण्ड का’ आणि ‘खतरों के खिलाडी’ मुळे चर्चेत असलेला अर्जुन कपूर याने नुकतेच एका कार्यक्रमात तिच्या सोबत सेल्फी घेणे पसंत केले. अर्जुन कपूरसाठी ही खरंतर आश्चर्यचकित आणि आनंदीत करणारी बाब होती. सोशल मीडियावर सध्या हा सेल्फी व्हायरल झाला आहे. }}}}