अर्जुन रामपालसोबलत सेल्फीसाठी उर्वशी गेली बाथरुमपर्यंत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 14:19 IST
अर्जुन रामपालसारखा धिप्पाड-बॉडी बिल्डर हीरो कोणाला घाबरू शकतो. बरं भीती वाटणे ठीक आहे, पण बाथरुममध्ये पळून जाण्या इतपत त्याने ...
अर्जुन रामपालसोबलत सेल्फीसाठी उर्वशी गेली बाथरुमपर्यंत?
अर्जुन रामपालसारखा धिप्पाड-बॉडी बिल्डर हीरो कोणाला घाबरू शकतो. बरं भीती वाटणे ठीक आहे, पण बाथरुममध्ये पळून जाण्या इतपत त्याने कोणाचा धसका घेतला आहे? ती दुसरी-तिसरी कोणी नसून ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ फेम उर्वशी रौतेला आहे.अलिकडे उर्वशी आणि कॉन्ट्रोव्हर्सी असे जणू काही समीकरणच बनले आहे. प्रसिद्धी आणि काम मिळवण्यासाठी ती इंडस्ट्रीमधील लोकांच्या एवढी मागे लागते की तिला पाहून ते मार्ग बदलतात. सलमानच्या ब्लॉकबस्टर ‘सुल्तान’मध्ये रोल मिळवण्यासाठी तिने दिग्दर्शक अब्बास जफरशी जवळीक वाढवली होती. तिला भूमिका तर नाही मिळाली पण त्यामुळे निदान मीडियाच्या चर्चेत आली.अशाच कारणासाठी ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तुम्हाला तर माहितच आहे की, नुकतेचमनीष मल्होत्राच्या ५०व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी किती आटापीटा केला.प्रसिद्धीसाठी हापापलेली उर्वशी पार्टीतील जवळपास सगळ्याच फोटोंमध्ये दिसले. तिच्या अशा वागण्यामुळे पार्टीमध्ये एक सेलिब्रेटी एवढा कंटाळला की, तिच्यापासून दूर जाण्यासाठी तो बाथरुममध्ये जाऊन लपला.पार्टीतील सगळ्या सेलिब्रेटींसोबत फोटो काढल्यानंतर उर्वशी अर्जुनसोबत फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे लागली. आधी अर्जुनने काही फोटो काढलेसुद्धा. पण तिचे काही यावर समाधान झाले नाही. त्याच्यासोबत तिने वेगवेगळ्या पोझमध्ये सेल्फी घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो एवढा वैतागला की, तिच्यापासून दूर जाण्यासाठी त्याला बाथरुममध्ये आसरा घ्यावा लागला. हँडसम हंक :अर्जुन रामपालबरं एवढेच नाही, तिने जॅकलिन फर्नांडिससोबतही असे केले. मुळात तिला पार्टीमध्ये कोणी बोलावले हेच कळत नव्हते. तिच्या एका मित्रानुसार ती मनीष मल्होत्राची जवळची मैत्रिण आहे, म्हणून ती पार्टीला गेली होती. पण तिच्या येण्यामुळे अनेकांना काढता पाय घ्यावा लागला हेदेखील तेवढेच खरे.आता हे सगळे ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतेय हे स्पष्टच आहे. परंतु ती जर अशीच वागत राहिली तर येथून पुढे लोक तिला पार्टीला येण्याचे आमंत्रण देण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागेल. cnxoldfiles/a> ‘गल बन गयी’ या चित्रपटातीलएका गाण्याचे शूटिंग संपविले आहे. या गाण्याचा अनुभव शेअर करताना उर्वशी म्हणाली, हे गाणे करणे माझ्यासाठी कठीण काम होते. यासाठी मला मार्शल आर्टपासून ते तायक्वाँदो शिकावे लागले. मला या दोन्ही कला शिकायच्या होत्या. या गाण्याच्या निमित्ताने मला ते शिकता आले. मी यात खरोखरची अॅक्शनन केली आहे, म्हणून मी बॉलिवूडमधील अक्षयची फिमेल व्हर्जन आहे.