Join us  

अर्जुन रामपालला मिळेना काम! आता ‘फायनल कॉल’च वाचवू शकते करिअर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 6:00 AM

एकेकाळी शाहरूख खान आणि हृतिक रोशनसोबत पंगा घेणारा अभिनेता अर्जुन रामपाल याचे फिल्मी करिअर जवळ जवळ संपल्यात जमा आहे.

ठळक मुद्देतूर्तास अर्जुन त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. गर्लफ्रेन्ड गॅबरिलासोबत अर्जुन अगदी बिनधास्त मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसतो.

एकेकाळी शाहरूख खान आणि हृतिक रोशनसोबत पंगा घेणारा अभिनेता अर्जुन रामपाल याचे फिल्मी करिअर जवळ जवळ संपल्यात जमा आहे. होय, शाहरूख खानचा ‘रा-वन’ हा अर्जुनचा शेवटचा मोठा प्रोजेक्ट होता. या चित्रपटादरम्यान अर्जुन व शाहरुख यांच्यात वाजले होते. या वादाचा शाहरुखवर कुठलाच परिणाम झाला नाही. पण अर्जुनच्या करिअरची नौका मात्र डगमगू लागली. या वादानंतर अर्जुनला मोठे प्रोजेक्ट मिळणे बंद झाले आणि तो केवळ लहान-सहान चित्रपटांपुरताच उरला.

मध्यंतरी अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी याच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘डॅडी’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून अर्जुनने कमबॅक केले. पण हा चित्रपटही सुपरडुपर फ्लॉप राहिला. यानंतर ‘पलटन’ या मल्टिस्टारर चित्रपटात तो दिसला. पण हा चित्रपटही दणकून आपटला. यातून सावरण्यासाठी अर्जुनने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. पण तिथेही तो अपयशी ठरला. अर्थात आता दीर्घकाळानंतर अर्जुनला ‘द फायनल कॉल’ या वेबसीरिजमध्ये काम मिळाले आहे. या बेबसीरिजचा ट्रेलर लॉन्च झालाय आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. तूर्तास हा प्रतिसाद पाहून अर्जुन भारावलाय आणि म्हणूनच हा ट्रेलर इंडस्ट्रीतील दिग्गजांना फॉरवर्ड करण्याचा सपाटा त्याने लावलाय. कदाचित यामुळे तरी एखादा मोठा प्रोजेक्ट मिळेल, अशी अपेक्षा अर्जुनला असावी.

तूर्तास अर्जुन त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. गर्लफ्रेन्ड गॅबरिलासोबत अर्जुन अगदी बिनधास्त मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसतो.काही महिन्यांपूर्वी अर्जुनच्या आईचे निधन झाले. यावेळी गॅबरिला पूर्णवेळ अर्जुनसोबत त्याला सांभाळताना दिसली. गॅबरिला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल; या चित्रपटातून तिन े बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नव्हता. याशिवाय काही म्युझिक व्हिडिओमध्येही ती दिसली आहे.

टॅग्स :अर्जुन रामपाल