Join us  

मलायका अरोरा व अर्जुन कपूर पुन्हा सोबत! नव्याने सुरू झाली अफेअरची चर्चा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 6:01 PM

काल रात्री ‘लॅक्मे फॅशन वीक2018’ दरम्यान मलायका व अर्जुन पुन्हा एकत्र दिसले आणि पुन्हा एकदा नव्याने चर्चेचा सुरूवात झाली. 

मलायका अरोरा आणि अरबाज खान गतवर्षीचं एकमेकांपासून कायदेशीररित्या विभक्त झालेत. आपल्या घटस्फोटाच्या बातमीमुळे दोघेही गतवर्षी चांगलेच चर्चेत राहिले. अर्थात घटस्फोटानंतरही त्यांच्यात कुठलीही कटुता निर्माण झाली नाही. अनेकप्रसंगी दोघेही एकत्र दिसले. खरे तर मलायका व अरबाजच्या घटस्फोटाला अभिनेता अर्जुन कपूर जबाबदार आहे, असे मानले गेले होते. मलायका व अर्जुनची वाढती जवळीक या घटस्फोटाला कारणीभूत ठरली, अशीच त्यावेळी चर्चा होती.   ही बातमी सगळ्यांसाठीच शॉकिंग होती. कारण अर्जुन कपूरचे कुटुंब आणि सलमानचे कुटुंब यांच्यात घनिष्ट संबंध होते. शिवाय अर्जुन कपूर सलमानची बहीण अर्पिता हिला अनेक वर्ष डेट करत होता. अर्थात अर्जुन वा मलायका अद्यापही यावर काहीही बोलले नाहीत. पण काल रात्री ‘लॅक्मे फॅशन वीक2018’ दरम्यान मलायका व अर्जुन पुन्हा एकत्र दिसले आणि पुन्हा एकदा नव्याने चर्चेचा सुरूवात झाली. या शोदरम्यान मलायका व अर्जुन एकमेकांच्या आजु-बाजूला बसलेले दिसले.

 अर्जुनच्या बाजूला त्याच्या बहीणी जान्हवी कपूर आणि खुशी कपूरही होत्या. पण मलायका व अर्जुन एकमेकांच्या बाजूला बसलेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. बघता बघता दोघांचाही हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. कदाचित अर्जुन व मलायका आपले नाते जाहिर करण्याच्या तयारीत आहेत, असा अर्थ यावरून काढला जातोय. कारण दोघेही कॅमेऱ्यांपुढे जराही बिचकले नाहीत. दोघेही एकमेकांसोबत आनंदी दिसले.

 एका मुलाखतीत, अर्जुन माझा केवळ एक चांगला मित्र असल्याचे मलायका म्हणाली होती.लवकरचं अर्जुनचे ‘नमस्ते इंग्लंड’, ‘संदीप और पिंकी फरार’ हे दोन चित्रपट रिलीज होत आहेत. तर मलायका विशाल भारद्वाज यांच्या ‘पटाखा’मध्ये आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे.

 

 

टॅग्स :मलायका अरोरा