Join us

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा पुन्हा दिसले या ठिकाणी एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 12:34 IST

अर्जुन आणि मलायका हे नुकतेच डिनरसाठी मुंबईतील एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी हॉटेलच्या बाहेर त्यांना मीडियाच्या कॅमेऱ्यात टिपण्यात आले.

अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात वेडी झालीय. तूर्तास संपूर्ण इंडस्ट्रीत सर्वत्र मलायका आणि अर्जुन यांच्याच प्रेमाच्या चर्चा रगंल्या आहेत. पूर्वी मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर पळणारे हे जोडपे सध्या मीडियाच्या समोर हातात हात घालून फिरत आहेत. नुकतेच या दोघांना मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर पाहाण्यात आले. 

अर्जुन आणि मलायका हे नुकतेच डिनरसाठी मुंबईतील एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी हॉटेलच्या बाहेर त्यांना मीडियाच्या कॅमेऱ्यात टिपण्यात आले. अर्जुनने यावेळी काळ्या रंगाचे जॅकेट आणि जीन्स घातली होती तर मलायका जीन्स आणि टी-शर्टमध्ये दिसली. मलायकाच्या खांद्यावर हात ठेवत तिचा लोकांपासून आणि मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून अर्जून बचाव करताना या फोटोत दिसत आहे. 

अर्जुन आणि मलायका लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहे. अलीकडे ‘कॉफी विद करण 6’च्या सेटवर आमिर खानसोबत काही काळ मलायका अरोरा ही सुद्धा दिसली आणि तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाच्या चर्चेला आणखी जोर चढला. यादरम्यान मलायकाला गमतीने छेडताना करण जोहर ‘इशारों इशारों मे’ बरेच काही बोलून गेला. मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत त्याने या कार्यक्रमात दिले. 

अर्जुन कपूर हा मलायकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. गेल्या काही दिवसांत मलायका आणि अर्जुन दोघेही खुल्लमखुल्ला एकत्र फिरताना दिसत आहेत. मलायकाने आपला वाढदिवस खास अर्जुनसोबत साजरा केला होता. अगदी अलीकडे ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’च्या मंचावरही दोघांची केमिस्ट्री दिसली. पूर्वी लॅक्मे फॅशन वीकमध्येही हे कपल एकत्र दिसले होते. आता ताजी बातमी खरी मानाल तर मलायका आणि अर्जुन दोघेही पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. होय, फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, मलायका आणि अर्जुन यांनी अनेक महिन्यांच्या नात्यानंतर आता लग्नबंधनात अडकण्याचे ठरवले आहे. पण दोघेही आपल्या नात्यावर सध्या मौन बाळगून आहेत. आपल्या नात्याविषयी मीडियात बोलणे ते टाळत आहेत.  

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा