Join us

अर्जुन आॅन हाय हिल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 01:30 IST

         चित्रपट हिट होण्यासाठी कलाकार काय काय करतील याचा खरच नेम नाही. मग ते चित्रपटाच्या प्रमोशन ...

         चित्रपट हिट होण्यासाठी कलाकार काय काय करतील याचा खरच नेम नाही. मग ते चित्रपटाच्या प्रमोशन साठी केलेले साँग असो किंवा चित्रपटातील एखादा हटके लुक, आॅर डिफरंट सीन असो. प्रमोशनसाठी या वेगळ््या गोष्टींचा पुरेपुर फायदा करुन घेतला जातो. आणि त्याचाच फायदा चित्रपटाच्या बॉक्स आॅफिस कलेक्शनसाठी डेफिनेटली होतो. आता हेच पाहा ना अर्जुन कपुर आणि करिना कपुर या जोडीचा आगामी चित्रपट कि अ‍ॅन्ड का हा प्रदर्शनापुर्वीच बराच चर्चेत आहे.                  मग ते पोस्टरमध्ये अर्जुन कपुरच्या गळ््यातील मंगळसुत्र असो किंवा अर्जुन- करिनाचा किसींग सीन असो. आता त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत कोणत्याही हिरोने केलेली नसेल ती म्हणजे आर्जुनने चक्क हाय हिल्स मध्ये एका गाण्यावर डान्स केला आहे. पिंक कलरचे हाय हिल्स त्याने नूसतेच कॅरी केले नाहीत तर त्यावर ठुमके लावले आहेत. आता प्रेक्षकांच्या पसंतीस त्याचे हे गाणे अन हाय हिल्सचा लुक येतोय का हे लवकरच समजेल.