Join us

अर्जुन चांगला मित्र - ज्ॉकलिन फर्नांडिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:48 IST

ज्ॉ कलीन फर्नांडिस ही काही दिवसांपासून अर्जुन कपूरला डेट करत आहे, अशी चर्चा आहे. परंतु, आता ज्ॉकलीनने या गोष्टीबद्दल ...

ज्ॉ कलीन फर्नांडिस ही काही दिवसांपासून अर्जुन कपूरला डेट करत आहे, अशी चर्चा आहे. परंतु, आता ज्ॉकलीनने या गोष्टीबद्दल साफ नकार दिला आहे. खरंतर, ज्ॉकलीनने खुलासा केला आहे की,' अर्जुन तिच्या काही खास मित्रांमध्ये समाविष्ट आहे. ज्ॉकलीन म्हणाली की,' अर्जुन बॉलीवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून माझा खुपच चांगला मित्र आहे. कालच त्याच्यासोबत माझं बोलणं झालं. त्यावेळी तो म्हणाला की,' हे मीच सुरू केले आहे. त्यावर तू कमेंट केली की, यानंतर मी हे सर्व सुरू केले आहे. अर्जुन आणि सोनम हे दोघे माझे खुप चांगले मित्र आहेत. परंतु, मी त्याच्यासोबत डेटवर जाऊ शकत नाही. तिने सांगितले की,' सोनमशिवाय माझे वरूण, रणबीर आणि रणवीर यांच्यासोबत खुप चांगले संबंध आहेत. आम्ही सोबतच खुप फिरतो. अर्जुन सोनमचा भाऊ आहे, यासाठी माझे त्याच्यासोबतही चांगले संबंध आहेत. अर्जुन खुपच समजूतदार आणि मेहनती आहे. एकमेकांच्या मैत्रीचा आम्ही आदर करतो. परंतु, आमच्यामध्ये यापेक्षा काही जास्त नाहीये.