Join us

अरबाज म्हणतो,‘वैयक्तिक आयुष्यात दखल देऊ नका’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 05:06 IST

अभिनेता अरबाज खान आणि मलाईका अरोरा खान हे दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी चर्चेत होत्या. मात्र, आता ...

अभिनेता अरबाज खान आणि मलाईका अरोरा खान हे दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी चर्चेत होत्या. मात्र, आता अरबाज खानने टिष्ट्वट केले आहे की,‘ आमच्या आयुष्यात प्लीज संकटं आणखी वाढवू नका. वैयक्तिक आयुष्यात एवढी दखल देणे योग्य नाही. माझे आणि मलाईकाचे इन्स्ट्राग्रामवरील फोटो कृपा करून तपासू नका. कुणाच्या आयुष्यात किती लक्ष द्यायचे हे आपण ठरवायला हवे. त्यामुळे सोशल मीडियाचा गैरवापर करू नका. ’ नुकत्याच झालेल्या अर्पिता खान हिच्या गोदभराई रसममध्ये देखील हे दोघे नव्हते हा आता पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.