Join us

अरबाज खान विदेशी तरुणीसोबत करणार लग्न ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 11:57 IST

काही दिवसांपूर्वीच अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला आहे. 2016मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. यावर्षी ...

काही दिवसांपूर्वीच अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला आहे. 2016मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. यावर्षी त्यांच्या घटस्फोटाला कोर्टातून मंजुरी देखील मिळाली आणि मलायका आणि अरबाजचा 18 वर्षांचा संसार तुटला. अरबाज आणि मलायकाचा संसार वाचवण्यासाठी सलमान खानेन अनेक प्रयत्न केले मात्र ते अयशस्वी झाले. घटस्फोटाचे कारण अनेकवेळेला मलायका असल्याची चर्चा झाली. मलायका एक बिझनेसमेनला टेड करत असल्याच्या बातम्या आल्या. मात्र आता काहीशी वेगळीच चर्चा रंगते आहे. अरबाज खान पुन्हा एकदा बोहल्यावर चढायला तयार झाला आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलात अरबाज खान पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याचे समजते आहे.   मीडियाच्या रिपोर्टसनुसार मलायकापासून विभक्त झाल्यानंतर अरबाज खानच्या आयुष्यात एका नव्या सुंदरीचे आगमान झाले आहे. एलेक्जेंड्रा असे या तरुणीचे नाव आहे. अरबाज हिला काही दिवसांपासून टेड करत असल्याची माहिती होती मात्र आता लवकरच अरबाज एलेक्जेंड्रासोबत विवाह बंधनात अडकणार असल्याचे समजते आहे. अरबाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.काही दिवसांपूर्वी एका इंटव्ह्युमध्ये अरबाजला तुझ्या आयुष्यात आलेल्या नव्या मुलीबद्दल काय सांगशील असा प्रश्न विचारण्यात आला होता यावेळी ती माझी फक्त चांगली मैत्रिण असल्याचे तो म्हणाला होता.आम्ही एकमेंकाना टेड करत आहोत. एलेक्जेंड्रा हिचे गोव्यात हॉटेल आहे. मलायका आणि अरबाजचा घटस्फोटा झाल्यानंतरही अनेक वेळा त्यांना एकत्र पाहाण्यात आले होते. यावर त्यांनी आम्ही अजूनही बिझनेस पार्टनर असल्याचे सांगितले होते. दबंग 3 ची पण सहनिर्माती म्हणून मलायका असणार आहे असे ही कळते आहे.