Join us  

सावत्र आई शूराबरोबर डिनरला गेला मलायका-अरबाजचा लेक, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 12:12 PM

अरबाजचं फॅमिली डिनर! दुसरी पत्नी शूरा आणि लेक अरहान खानबरोबरचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्याशी निकाह करत दुसऱ्यांदा संसार थाटला. वयाने लहान असलेल्या शूराशी लग्न केल्याने अरबाजला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता दुसऱ्या लग्नानंतर अरबाज त्याची पत्नी शूरा आणि लेक अरहान यांच्याबरोबर डिनरला गेला होता. यावेळी त्यांना स्पॉट करण्यात आलं. 

अरबाजने शूरा आणि अरहानबरोबर पापाराझींना फोटोसाठी पोझही दिल्या. डिनरनंतर घरी जाताना अरहान गाडी चालवताना दिसला. तेव्हा त्याच्या बाजूला सावत्र आई शूरा बसली होती. तर अरबाज पाठीमागे बसला होता. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन त्यांचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत पुन्हा अरबाजला ट्रोल केलं आहे. "अरहानला क्यूट सावत्र आई भेटली आहे," अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "ती त्याच्या मुलाची गर्लफ्रेंड वाटत आहे," असं म्हटलं आहे. 

अरबाजने डिसेंबर २०२३मध्ये शूरा खानशी निकाह केला. शूरा अरबाजपेक्षा २५ वर्षांनी लहान आहे. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित होता. अरबाजने १९९८ साली मलायका अरोराशी निकाह करत संसार थाटला होता. १९ वर्षांनंतर २०१६मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. 

टॅग्स :अरबाज खानमलायका अरोरासेलिब्रिटी