Join us

बॉलीवुडच्या बादशाहला ‘ऍपल’ गिफ्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 13:03 IST

किंग खान शाहरुखची लॉटरी लागणार आहे. आता ही लॉटरी म्हणजे खरीखुरी लॉटरी किंवा नवा बिग बजेट सिनेमा नाही. तर ...

किंग खान शाहरुखची लॉटरी लागणार आहे. आता ही लॉटरी म्हणजे खरीखुरी लॉटरी किंवा नवा बिग बजेट सिनेमा नाही. तर ते लॉटरी म्हणजे किंग खान आता ऍपलचा भारतामधील ब्रँड ऍम्बेसेडर बनणार आहे. नुकतंच ऍपलचे सीईओ टीम कुक भारत दौ-यावर आले होते. यावेळी बादशाह खाननं टीम कुक यांच्यासाठी मन्नतवर जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलीवुडचं अवघं तारांगण अवतरलं होतं. यावेळी कुक आणि शाहरुख यांच्यामध्ये ब्रँड ऍम्बेसेडर बनण्याबाबत चर्चा झाली असून लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे.