Join us  

​ अनुष्काच्या साखरपुड्याच्या अंगठीची किंमत वाचून व्हाल थक्क! पोशाख अन् दागिणेही होते तसेच खास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 8:09 AM

आज सगळीकडे केवळ एकच बातमी आहे, ती म्हणजे विराट कोहली व अनुष्का शर्माच्या लग्नाची. काल सोमवारी  विराट व अनुष्का ...

आज सगळीकडे केवळ एकच बातमी आहे, ती म्हणजे विराट कोहली व अनुष्का शर्माच्या लग्नाची. काल सोमवारी  विराट व अनुष्का इटलीत एका ग्रॅण्ड सोहळ्यात लग्नबंधनात अडकले. शेवटपर्यंत ‘सीक्रेट’ ठेवल्या गेलेल्या या लग्नाच्या नानाविध बातम्या आता समोर येत आहे. या लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडिओ, वेगवेगळ्या कार्यक्रमांचे फोटो सगळे व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओ व फोटोंमधील अनुष्का व विराट दोघांच्या चेह-यावरचा आनंद स्पष्ट दिसतोय. लग्नाआधी विराट व अनुष्काची रिंग सेरेमनी झाली. यावेळी विराट व अनुष्का दोघांनीही एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घातली. या रिंगसेरेमनीबद्दलची एक खास बातमी आहे. होय, विराटने अनुष्काच्या बोटात घातलेली अंगठी साधीसुधी नव्हती तर हिºयाची होती. अनुष्कासाठी ही अंगठी शोधण्यात विराटने तीन महिने घालवले. अखेर आॅस्ट्रियात त्याला एक अंगठी पसंत पडली. आॅस्ट्रियाच्या डिझाईनरने डिझाईन केलेल्या या अंगठीचे वैशिष्ट्य म्हणजे, ती प्रत्येक अँगलने बघितल्यास वेगवेगळी दिसते. या अंगठीवर विराटने १ कोटींपेक्षा अधिक खर्च केला.रिंग सेरेमनीत अनुष्काने वेल्वेट मरून साडी निवडली होती. साडीवर मोती आणि जरदोजी व मरोरी वर्क होते. यावेळी तिने घातलेल्या गळ्यातील सेटवर पर्ल चोकरसोबत डायमंडचे काम केले गेले होते. कानात मॅचिंग स्टड, केसांचा अंबाडा आणि त्यावर खोचलेले गुलाबाचे फुल अशा लूकमध्ये अनुष्का कमालीची सुंदर दिसत होती.अनुष्काने लग्नात घातलेला लहंगा आणि दागिणेही असेच खास होते. अनुष्काचा लहंगा सब्यसाची यांनी डिझाईन केला होता. ६७ कारागिरांनी ३२ दिवस खपून तो तयार केला. पिंक कलरच्या या लहंग्यावर हाताने खास कढाई वर्क केले गेले होते. विराटने लग्नात पांढ-या रंगाची शेरवानी घातली होती. यावर बनारसी कढाई काम केले गेले होते. शिवाय हस्तीदंताची विशेष कारीगिरी करण्यात आली होती. टसर फ्रॅबिकच्या स्टोलसह विराटने रोझ सिल्क चंदेरी पायजाम घातला होता.मेहंदी सेरेमनीत अनुष्काने तिच्या आवडीचा पिंक शेड निवडला होता. ग्राफिक क्रॉप टॉपसह फुशिया पिंक आणि आॅरेंज अशा दोन रंगांनी सिल्क फॅब्रिकने लहंगा सजवला होता. यावर कोलकात्याची फेमस ब्लॉक प्रिंट आणि जरदोजी व मोरारी वर्क होते. विराटने यावेळी खादीचा पांढरा कुर्ता व चुडीदार कॅरी केला होता.ALSO READ : wedding album : ​पाहा, विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या हळद-मेहंदी ते सप्तपदीपर्यंतचे फोटो!ज्वेलरीमध्ये अनुष्काने २२ कॅरेट गोल्ड झुमके कॅरी केले होते. यावर अनकट डायमंडसोबत जपानी मोत्यांचे काम केले होते. अनुष्काने घातलेली ज्वेलरीचे म्हणाल तर, तिच्या गळ्यातील सेटमध्ये अनकट डायमंडसोबत जपानी मोती वापरले गेले होते.