अनुष्का बनणार ‘फिल्लोरी’ची सहनिर्माती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 10:03 IST
ब्रेकअपच्या धक्क्यातून सावरलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा ‘फिल्लोरी’ या नव्या रोमॅन्टिक बॉलिवूडपटासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अभिनयासोबत या चित्रपटाच्या ...
अनुष्का बनणार ‘फिल्लोरी’ची सहनिर्माती
ब्रेकअपच्या धक्क्यातून सावरलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा ‘फिल्लोरी’ या नव्या रोमॅन्टिक बॉलिवूडपटासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अभिनयासोबत या चित्रपटाच्या सहनिर्मातीची भूमिकाही ती वठवणार आहे. गायक-अभिनेता दिलजीत दोसांढ व सूरज शर्मासोबत ती या चित्रपटात झळकेले. अनशई लाल यांच्या दिग्दर्शनाखाली येणारा हा चित्रपट एक आगळीवेगळी प्रेमकथा असेल. अनुष्काने गतवर्षी ‘एनएच १०’ द्वारे चित्रपट निर्मितीत पाऊल ठेवले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.