Join us  

​अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे हे आहेत फ्युचर प्लान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 6:30 AM

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटलीमध्ये लग्न करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट ...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटलीमध्ये लग्न करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची बातमी अखेर खरी ठरली. काल ११ नोव्हेंबरला अनुष्का आणि विराट यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो Borgo Finocchieto या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत २१ तारखेला विराटच्या कुटुंबियांसाठी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी होणार असून अनुष्का आणि विराटच्या बॉलिवूडमधील आणि क्रिकेट क्षेेत्रातील मित्र मैत्रिणींसाठी २६ तारखेला मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. रिसेप्शन नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विराट आणि अनुष्का साऊथ आफ्रिकेला रवाना होणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विराट पुढच्या सिरिजच्या तयारीला लागणार असून त्या काळात अनुष्का त्याच्यासोबतच वेळ घालवणार आहे, त्यानंतर अनुष्का भारतात परतणार असून शाहरुख खानसोबतच्या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. फेब्रुवारी महिन्यात वरुणसोबत ती सुई धागा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात करणार आहे. तसेच डिसेंबर महिन्यात मुंबईतील वरळी येथील घरात ते गृहप्रवेश करणार आहेत. दरम्यान, यापूर्वी हे दोघे ९ ते १२ डिसेंबरदरम्यान विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. परंतु अनुष्काच्या प्रवक्त्याकडून ही चर्चा निराधार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर अनुष्का परिवारासह इटलीला रवाना झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर दोघांच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे जेव्हा अनुष्का परिवारासह इटलीला जात होती, तेव्हा शर्मा कुटुंबियांचे पंडितही त्यांच्यासोबत रवाना झाले होते. त्यामुळे या दोघांची लगीनघाई सुरू असल्याचे जवळपास स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर लग्नात सहभागी होणाऱ्या गेस्टची लिस्टही समोर आली होती. विराट आणि अनुष्का गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. पहिल्यांदा जेव्हा ते एका जाहिरातीदरम्यान एकत्र आले होते, तेव्हाच त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली होती. Also Read : डोळ्यांचे पारणे फेडणारा विराट कोहली व अनुष्का शर्माचा लग्नसोहळा! व्हिडिओ पाहाच!