Join us

अनुष्का म्हणाते, मी स्वता:चे निर्णय स्वत: घेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 13:43 IST

अनुष्का शर्माला बॉलिवूडमध्ये येऊन जवळपास 9 वर्षे झाली आहेत. या 9 वर्षांच्या काळात अनुष्काने स्वत:ला अभिनेत्री म्हणून तिने सिद्ध ...

अनुष्का शर्माला बॉलिवूडमध्ये येऊन जवळपास 9 वर्षे झाली आहेत. या 9 वर्षांच्या काळात अनुष्काने स्वत:ला अभिनेत्री म्हणून तिने सिद्ध केले आहे. त्याच बरोबर तिने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. आज पर्यंत तिने कधीच कोणाला प्रभावित होऊन एखादा निर्णय घेतला नाही. त्यामुळे आज ती इथपर्यंत पोहोचू शकली असे अनुष्काचे म्हणणे आहे. अनुष्काने यशराज बॅनरच्या रब ने बना दी जोडी या चित्रपटातून शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये आपल्याला करिअरला सुरुवात केली. तुम्ही जेव्हा या इंटस्ट्रीत बाहेरुन येता तेव्हा त्याचे पोझिटिव्ह आणि नेगेटिव्ह अशा दोन्ही बाजू आहेत. तुमचा मार्ग चुकण्याचे चॅन्सेस असतात आणि तुम्हाला इकडे रुळायला वेळ लागतो ही झाली नेगेटिव्ह बाजू तर दुसरी पोझिटिव्ह बाजू अशी आहे तुमच्यावर कुठलच दडपण ऩसते तुम्हाला पाहिजे त्या भूमिका तुम्ही करु शकता असे अनुष्काने दिलेल्या मुलाखती दरम्यान ती म्हणाली.  अनुष्काने एनएच 10 या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. वयाच्या 25व्या वर्षी अऩुष्काने चित्रपटाची निमिर्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी लोकांनी तिचे अॅक्टिंगमधले करिअर चालत नसल्याने मी हा निर्णय घेतल्याची टीका माझ्यावर केली. आता चित्रपटात काही करण्यासारख राहिलेले नसल्याने मला हे सुचले असे ही लोक म्हणाल्याचे अनुष्का सांगते.रब ने बना दी जोडी या चित्रपटानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही बँड बाजा बारात, जब तक है जान, पी. के आणि सुल्तान अशी अनेक हिट चित्रपट दिले. निर्मिती म्हणून तिचा फिल्लौरी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  विराट कोहली बरोबर असलेल्या संबंधामुळे ती चांगलीच चर्चेत आली. मात्र तिने आणि विराटने त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही. 1 जानेवारी 2017 ला ते दोघं साखरपुडा करणार अशा अफवा आल्या होत्या. 30 डिसेंबर 2016 ला हे लव्हबर्ड्स