अनुष्का-हृतिक दिसणार एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:45 IST
राकेश रोशन यांनी संजय गुप्ता यांना त्यांच्या आगामी चित्रपटासाठी साईन केले आहे. तसेच हृतिक रोशन याला घेऊन चित्रपट साकारण्यात ...
अनुष्का-हृतिक दिसणार एकत्र?
राकेश रोशन यांनी संजय गुप्ता यांना त्यांच्या आगामी चित्रपटासाठी साईन केले आहे. तसेच हृतिक रोशन याला घेऊन चित्रपट साकारण्यात येणार असल्याचे कळते. करिना कपूर आणि परिणीती चोप्रा या दोघींनाही वगळून आता अनुष्का शर्माला हृतिक रोशनसोबत घेतले जाणार आहे. अंध जोडप्याच्या कथानकावर आधारित चित्रपट असून करिनाला अशा चित्रपटात काही रस देखील नव्हता. चित्रपट कायदेशीर बाबींवर अडकली असून संजय गुप्ताने स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप अभिनेता सुधांशू पांडे यांनी केला आहे.