Join us  

गौरी खानने लेक सुहानाला इंटरव्ह्यू देण्यापासून थांबवलं?, ट्रोलर्सना अनुष्काने चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 5:54 PM

गौरी खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहून असं वाटतंय गौरी सुहानाला अनुष्काला इंटरव्ह्यू देण्यापासून थांबवते आहे.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं ग्रँड ओपनिंग मुंबईत अलिकडचे पार पडलं. या सोहळ्याला संपूर्ण बॉलिवूड आलं होतं. हॉलिवूडच्या टॉम हॉलंड, अभिनेत्री झेंडया आणि जीजी हदीद यासारख्या कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. इव्हेंट संपल्यानंतरही या कार्यक्रमाची चर्चा अजूनही सुरु आहेच. याच दरम्यान गौरी खानचा या इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात तिच्यासोबत सुहाना खान देखील दिसतेय. व्हिडीओ पाहून असं वाटतंय की, अनुष्का दांडेकर गौरी आणि सुहानाला इंटरव्ह्यू  देण्याची विनंती करते आहे पण गौरी नकार देते. हे पाहून गौरीला ट्रोल करण्यात येऊ लागलं यावर अनुष्काने स्पष्टीकरण दिलं आहे. 

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, तुम्ही लोक सतत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करताये तुम्हाला व्देष निर्माण करायचा आहे. आणि हे त्या लोकांचे फॅन आहेत जे या इव्हेंटला नव्हते. तुम्हाला वाटतंय मी खराब दिसले पाहिजे पण माफ करा मी यात फसणार नाही. काही लोकांना इंटरव्ह्यू द्यायला नाही आवडते आणि ते कधीच देत नाहीत. आणि हे ठीक आहे. मला वाटतंय मी खूप चांगलं काम केलं आणि मी माझ्या कामावर खूश आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला पाहून गौरी खानची वागणुक लोकांना आवडली नाही. ती अनुष्काला सुहानाचा  इंटरव्ह्यू  घेण्यापासून थांबवते आहे जी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं ग्रँड ओपनिंग गौरी खान लेक सुहाना आणि मुलगा आर्यन खानसोबत आली होती. 

 

टॅग्स :गौरी खानअनुषा दांडेकरसुहाना खाननीता अंबानी