Join us

अनुराग कश्यप म्हणतोय, योगामुळेच सुटला दारू आणि सिगारेटचा नाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 22:20 IST

अनुराग कश्यप याच्या चांगल्या-वाईट सवयींविषयी बरेच लोक जाणून आहेत. अनुराग ज्या पद्धतीने चित्रपट बनवितो, त्याच पद्धतीने तो रिअल लाइफमध्येही ...

अनुराग कश्यप याच्या चांगल्या-वाईट सवयींविषयी बरेच लोक जाणून आहेत. अनुराग ज्या पद्धतीने चित्रपट बनवितो, त्याच पद्धतीने तो रिअल लाइफमध्येही जगतो. एक काळ तर असा होता की, दारू आणि सिगारेटच्या नशेत तो २४ तास असायचा. थोडक्यात सांगायचे झाल्यास दारूशिवाय जगणे त्याला शक्यच नव्हते; मात्र आताच्या अनुरागकडे बघितले तर तो दारू आणि सिगारेटपासून चार हात लांब आहे. कुठल्याही प्रकारची नशा न करता तो केवळ आपल्या कामाकडे लक्ष देत आहे. आता तुम्ही म्हणाल की हा चमत्कार कसा झाला? तर चमत्काराचा उलगडा आज योग दिनानिमित्त झाला असून, ‘योगा’मुळेच अनुराग नशेपासून दूर गेला आहे. अनुरागच्या मते, त्याच्या आयुष्यात योगाचे विशेष महत्त्व आहे. याबाबतची आपबिती अशी की, अनुराग त्याच्या आगामी ‘मुक्केबाज’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीला पोहोचला होता. याठिकाणी त्याची भेट योग गुरु पुष्पांजली यांच्याशी झाली. पुढे अनुरागने पुष्पांजली यांच्याकडून १० जूनपर्यंत योगाचे ट्रेनिंग घेतले. अनुराग सांगतोय की, पहिल्या दिवशी तो केवळ अर्धा तासच योगा करू शकला. कारण त्याला लगेचच थकवा जाणवला. त्यानंतर त्याने हळूहळू योगा करण्यास अधिक वेळ दिला. आता त्याचा योगा करण्याचा अवधी वाढला असून, तो स्वत:ला खूपच रिलॅक्स फिल करतो. अनुराग म्हणतोय की, आता मी जेव्हा शूटिंगच्या सेटवर जातो तेव्हा तेथील उपस्थित स्टाफही मला अगोदरच्या तुलनेत अधिक तंदुरुस्त असल्याचे सांगतो. ट्रेनर पुष्पांजली शर्मा गेल्या काही वर्षांपासून योगा करीत आहेत. सेलिब्रिटी आणि विदेशी लोकांना ते योगाचे धडे देत आहेत. पण काहीही असो, अनुरागच्या आयुष्यात योगामुळे झालेला सकारात्मक बदल कौतुकास्पद असून, त्याने पुढील काळातही योगाची कास धरून आपले आयुष्य अधिक तंदुरुस्त ठेवावे, अशीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा असेल.