Join us  

Shocking! अँजिओप्लास्टीनंतर अशी झाली अनुराग कश्यपची अवस्था, ओळखूही येईना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 4:28 PM

चारच दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात अनुरागवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतरचा अनुरागचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अनुराग कश्यपचा ‘दोबारा’ चित्रपट पाइपलाईनमध्ये आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे.

आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारा बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) नुकतीच अँजिओप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतरचा अनुरागचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. अनुरागची मुलगी आलिया कश्यप हिने वडिलांचा एक व्हिडिओ इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे़ यात अनुरागला ओळखणंही कठीण झाले आहे. ( Anurag Kashyap latest Photo after undergoing angioplasty )

 आलियाने शनिवारी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अनुरागचे पूर्णपणे टक्कल दिसतेय. त्याच्या गळ्याभोवती काळ्या रंगाचा मास्क लटकतेय, दाढी वाढलेली दिसतेय. आलियाने त्याच्या चेह-यावर झूम करताच, ‘मला काही दिसत नाही’, असे अनुराग पुटपुटताना ऐकू येतो. त्यानंतर काही मुली हसता-खिदळताना पार्श्वभूमीवर ऐकू येतात.

अलीकडे अनुरागवर अँजिओप्लास्टी पार पडली. गेल्या आठवड्यात अनुरागच्या छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्याला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. काही चाचण्यानंतर त्याच्या हृदयात काही ब्लॉकेज असल्याचे आढळून आले होते. डॉक्टरांनी त्याची ताबडतोब अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ना दिला होता. त्यानुसार ही शस्त्रक्रिया पार पडली होती.48 वर्षीय अनुरागला काही आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यूएसमध्ये शिकत असलेली अनुरागची कन्या आलिया सध्या मुंबईत आहे. सध्या ती आपल्या वडिलांची काळजी घेतेय.

आलिया ही अनुराग आणि त्याची पहिली पत्नी आदिती बजाज यांची कन्या आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अनुराग कश्यपचा ‘दोबारा’ चित्रपट पाइपलाईनमध्ये आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. ‘मनमर्जिया’ चित्रपटानंतर अनुराग आणि तापसी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे सध्या काम सुरू आहे. या चित्रपटात पवेल गुलाटी तापसीसह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या साय-फाय थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग यावर्षी मार्चमध्ये संपले आहे. 

टॅग्स :अनुराग कश्यप