Join us

​‘गर्लफ्रेन्ड’ शुभ्रा शेट्टीसोबत इंटिमेट होताना दिसला अनुराग कश्यप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 14:52 IST

दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि शुभ्रा शेट्टी यांच्या अफेअरची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरु झालीय. होय, अनुराग व त्याच्यापेक्षा २१ ...

दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि शुभ्रा शेट्टी यांच्या अफेअरची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरु झालीय. होय, अनुराग व त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान असलेल्या शुभ्राचे काही फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यापैकी एका फोटोत अनुराग व शुभ्रा दोघेही इंटिमेट होताना दिसत आहेत. सोबत शुभ्राच्या हातात रिकामी बाटली आहे.यापूर्वी जुलै २०१६ मध्ये अनुराग व शुभ्राच्या रिलेशनची चर्चा झाली होती. यावेळी दोघांचा असाच एक फोटो समोर आला होता. त्यात अनुराग शुभ्राचे चुंबन घेत असताना दिसला होता.शुभ्राच्या एका मैत्रिणीच्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर झाला होता. खरे तर त्याआधी डिसेंबर २०१५ मध्येच अनुराग व शुभ्राच्या अफेअरच्या चर्चा कानावर आल्या होत्या. दोघेही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना जोर चढला होता. डिझाईनर मसाबा हिच्या संगीत सेरेमनीत स्वत: अनुरागने शु्रभाचा एक फोटो शेअर करत, ‘kHottie at the wedding’ असे लिहिले होते. तेव्हापासून अनुराग व शुभ्रा एकमेकांना डेट करत असल्याचे मानले गेले होते. अर्थात अफेअरच्या या बातम्यांनी अनुराग चांगलाच संतापला होता. केवळ संतापलाच नाही तर त्याने या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले होते. आपले म्हणणे खरे करण्यासाठी अनुरागने एका फोटोचा आधार घेतला होता. या फोटोत आमच्यासोबत अनेक मित्र आहेत. पण मीडिया केवळ माझ्यावर व शुभ्रावर फोकस करून वेगळ्याच कहाण्या गढत असल्याचे त्याने म्हटले होते. पण कदाचित ती त्यावेळी गोष्ट होती. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याचे दिसतेय. होय,अनुरागने स्वत: शुभ्रासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत आणि हे फोटो बरेच काही सांगणारे आहेत.शुभ्रा शेट्टी ही अनुरागपेक्षा २१ वर्षांनी लहान आहेत. अनुराग ४४ वर्षांचा आहे तर शुभ्रा केवळ २३ वर्षांची आहे. शुभ्राने मुंबईच्या सेंट जेवियर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. तूर्तास ती अनुरागच्या ‘फँटम फिल्म्स’ या प्रॉडक्शन कंपनीत काम करतेय.