Join us  

Anniversary Special : अरेच्चा...! अमिताभ बच्चन यांच्या वरातीत होते फक्त पाच जण, जाणून घ्या त्यांच्या लग्न सोहळ्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 5:00 PM

३ जून रोजी अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाला ४६ वर्षे झाली आहेत.

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चनजया बच्चन यांची जोडी आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते. पुरस्कार सोहळा असो किंवा पार्टी ते दोघे एकत्र पहायला मिळतात. ३ जून रोजी अमिताभ बच्चनजया बच्चन यांच्या लग्नाला ४६ वर्षे झाली आहेत. या निमित्ताने त्यांच्या लग्नातील हे काही मनोरंजक किस्से जाणून घ्या.

ऋषीकेश मुखर्जी यांनी त्यांच्या गुड्डी चित्रपटासाठी आधी जया यांच्या सोबत अमिताभ यांना घेतले होते. पण नंतर बिग बींना या चित्रपटातून काढण्यात आले. सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ लोक सांगतात की या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांच्यासाठी जया यांच्या मनात प्रेम व सहानुभूती निर्माण झाली. त्या दोघांची ओळख याच सेटवर झाली होती.

त्यानंतर १९७३ साली अमिताभ बच्चन व जया एकत्र अभिमान चित्रपटात पहायला मिळाले. या चित्रपटाच्या दरम्यान त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन व जया बच्चन यांना एकत्र सुट्टी व्यतित करण्यासाठी परदेशात जायचे होते. पण, त्यावेळी हरिवंशराय बच्चन यांनी जर जयासोबत सुट्टी एन्जॉय करायची असेल तर तिच्यासोबत लग्न करावे लागेल.

३ जून, १९७३ साली ते दोघे विवाहबंधनात अडकले.

अमिताभ बच्चन यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका अगदी साधी होती. ही पत्रिका हरिवंशराय बच्चन यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना दिली होती. या पत्रिकेत हिंदी मध्ये लिहिले होते की आमचा सुपुत्र अमिताभ व श्रीमती आणि श्री तरण कुमार भादुरी यांची सुपुत्री जया यांचे लग्न रविवार, ३ जूनला बम्बईत संपन्न झाले. तुमचा आशीर्वाद मिळावा.

अमिताभ बच्चन यांचे लग्न अगदी साधेपणाने झाले. त्यांच्या वरातीत होते फक्त पाच लोक. त्यात बॉलिवूडमधील फक्त गुलजार होते. जया बच्चन व त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त अभिनेते असरानी व फरीदा जलाल उपस्थित होते.

लग्नानंतर जया यांच्या कुटुंबियांनी भोपाळमध्ये स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या रिसेप्शनमध्ये मोठे दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.  

टॅग्स :अमिताभ बच्चनजया बच्चनगुलजार