Join us  

VIDEO : अंकिता लोखंडेने सुशांतला दिलेला शेवटचा संदेश व्हायरल, म्हणाली - 'तुला पुन्हा आपल्याजवळ...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 10:54 AM

'पवित्र रिश्ता' या मालिकेनेच सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावली आहे. या मालिकेच्या सेटवर जेव्हा सुशांत शेवटचा आला होता. तेव्हा अंकिता लोखंडेने त्याला मिठी मारली होती.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत भलेही एक होऊ शकले नाही. पण एक गोष्ट सगळ्यांनाच मान्य करावी लागेल की, जेव्हाही सुशांतचा उल्लेख होतो, लोकांच्या डोक्यात दुसरं नाव अंकिता लोखंडे हेच येतं. 'पवित्र रिश्ता' मालिकेत एकत्र काम करतानापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. या मालिकेनेच त्यांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावली आहे. या मालिकेच्या सेटवर जेव्हा सुशांत शेवटचा आला होता. तेव्हा अंकिता लोखंडेने त्याला मिठी मारली होती.  अंकिता आणि सुशांतचा हा खास फोटोसोबत अंकिताचा एक ऑडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडेने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुशांत सिंह राजपूतबाबत अनेक खुलासे केले होते. यावेळी जेव्हा अंकिताला विचारण्यात आले की, तिला सुशांतला शेवटचा काय संदेश द्यायचा आहे? यावर अंकिता फार भावूक झाली होती. अंकिता म्हणाली होती की, 'मी फक्त एवढंच म्हणेन की, सुशांतवर प्रेम करणारे खूप लोक आहेत...तुझ्यासाठी पूर्ण देश उभा आहे. तुला फक्त एक हात पुढे करायचा आहे. तुला परत माझ्याजवळ बोलवायचं आहे आणि त्याने यावं'.

अंकिता लोखंडेचा हा संदेश ऐकून कुणीही भावूक होईल. एक काळ होता जेव्हा अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतसोबत लग्न करण्याची स्वप्ने बघत होती. २०१६ मध्ये सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे लग्न बंधनात अडकणार होते. पण त्याआधीच दोघांचे मार्ग वेगळे झाले.

दरम्यान, सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सुशांत सिंह राजपूत त्याच्या भाच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. सुशांतचा असा मनमोकळा अंदाज त्याच्या जाण्यानंतर पहिल्यांदाच लोकांना बघायला मिळत आहे.

हे पण वाचा :

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडेच्या ब्रेकअपचे खरे कारण आले समोर

VIDEO : अंकिता लोखंडेने पोस्ट केला सुशांतसोबतचा एन्जॉय करतानाचा व्हिडीओ

ब्रेकअपनंतर एकमेकांशी कधीच बोलले नव्हते सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड