Join us

सुशांतच्या फेव्हरेट डॉगीसोबत मस्ती करताना दिसली अंकिता लोखंडे, व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 16:47 IST

सध्या अंकिताने तिच्या इन्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओत ती तिचे दोन डॉगी स्कॉच आणि हातचीसोबत मस्ती करताना दिसत आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे सतत चर्चेत आहे. सोशल मीडियातून ज्याप्रकारे अंकिता सुशांत आणि त्याच्या परिवारासाठी न्यायाची मागणी करत आहे. ते पाहून लोक अंकिताचं भरभरून कौतुक करत आहेत. सध्या अंकिताने तिच्या इन्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओत ती तिचे दोन डॉगी स्कॉच आणि हातचीसोबत मस्ती करताना दिसत आहे. कदाचित हे फार कमी लोकांना माहीत असेल की, सुशांत आणि अंकिता रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी मिळून स्कॉचला घरी आणले होते. 

स्कॉचसोबत सुशांत बराच वेळ घालवत होता आणि अंकिताही स्कॉचचा सांभाळ करत होती. पण सुशांत आणि अंकिताच्या ब्रेकअपनंतर अंकिताने एकटीने स्कॉचचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर ती हातची हा डॉगी घरी घेऊन आली. अंकिताचा हा व्हिडीओ पाहून फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. 

सुशांतचं स्वप्न पूर्ण करणार अंकिता

दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक लिस्ट बनवत होता आणि त्यानुसार तो त्याचं दिवसाचं शेड्युल बनवत होता. सुशांत सिंह राजपूतची ५० स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत. आता त्याच्या फॅन्सने त्याची राहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याला सुरूवात केली आहे. येत्या १३ सप्टेंबरला सुशांतचे फॅन्स झाडे लावणार आहेत. सुशांत सिंह राजपूतचं स्वप्न होतं की, तो १ हजार झाडे लावणार. सुशांतच्या या फॅनच्या मोहिमेत आता त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेही सामिल झाली आहे. नुकतीच अंकिता लोखंडे तिच्या आईसोबत झाडे खरेदी करायला गेली होती. यावेळी देशातील जनतेला एक मेसेजही दिला.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून अभिनेत्री अंकिता लोखंडे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. ती सुरूवातीपासून सुशांतच्या केसची सीबीआय चौकशीची मागणी करत होती. तसेच ती रिया चक्रवर्तीने सुशांतबाबत केलेले अनेक दावेही खोटे असल्याचे सांगत होती. अंकिता अजूनही सुशांतच्या जाण्याच्या दु:खातून पूर्णपणे सावरलेली नाहीये. ती नेहमीच सोशल मीडियात सुशांतबाबत काहीना काही शेअर करत असते. 

VIDEO : अंकिता लोखंडे पूर्ण करणार सुशांतचं शेवटचं स्वप्न, फॅन्सनाही केलं तिने आवाहन!

VIDEO : अध्ययन सुमनने या व्हिडीओतून उलगडलं सुशांतचं पूर्ण आयुष्य, अंकिता लोखंडे झाली नि:शब्द!

VIDEO : अंकिता लोखंडेने सुशांतला दिलेला शेवटचा संदेश व्हायरल, म्हणाली - 'तुला पुन्हा आपल्याजवळ...'

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत