Join us  

अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 10:05 AM

मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'.

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत केसमधून ड्रग्स प्रकरण समोर आल्यावर मंगळवारी एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली. बुधवारी सकाळी तिला भायखळा तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. अशात सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेने ट्विटरवर लांबलचक मेसेज लिहून रियावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अंकिताने हेही स्पष्ट केलं की, तिने कधीच म्हटलं नाही की, सुशांतची हत्या झाली आहे.

अंकिताने मेसेजेमध्ये लिहिले की, 'मला पुन्हा पुन्हा मीडिया विचारते की, काय वाटतं हा मर्डर आहे की सुसाइड? त्यामुळे मी हे स्पष्ट करण्यासाठी सांगते की, मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'.

सरकारवर विश्वास

अंकिताने लिहिले की, 'एक महाराष्ट्रीयन आणि भारतीय नागरीक असल्या कारणाने माझा राज्य सरकार पोलीस आणि केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा माझ्यासाठी 'विधवा' शब्दांचा वापर पब्लिकमध्ये झाला. मी त्यावर कधीही उत्तर दिलं नाही. मी केवळ २०१६ पर्यंत सुशांत आणि त्याच्या मेंटल हेल्थबाबत सांगायला पुढे आले'.

सुशांतच्या मेंटल हेल्थाबाबत माहीत  होतं

अंकिताने पुढे लिहिले की, 'डिअर हेटर्स, चला मान्य करू की, तुम्हाला तुमच्या मित्राबाबत सगळं काही नक्कीच माहीत असेल की, त्याच्या जीवनात आणि रिलेशनशिपमध्ये काय सुरू आहे. हे बघून चांगलं वाटलं की, अखेर तुम्ही झोपेतून उठलात. पण कदाचित तुम्ही आधी शुद्धीवर आले असता तर आपल्या मित्राला ड्रग्स न घेण्याचा सल्ला दिला असता. त्याना सुशांतच्या मेंटल हेल्थबाबत माहीत होतं कारण त्यांनी पब्लिकली सांगितलं होतं की, तो डिप्रेशनमध्ये होता'.

डिप्रेस्ड व्यक्तीला ड्रग्सची परवानगी द्यावी का?

अंकिताने प्रश्न विचारलाय की, 'काय तिने एका डिप्रेस्ड व्यक्तीला ड्रग्स सेवन करण्याची परवानगी द्यावी? त्याने त्याची मदत कशी होईल? त्याची कंडीशन त्या लेव्हलपर्यंत पोहोचली होती, ज्याने एक व्यक्ती सुशांतसारखा होईल. ती त्यावेळी सुशांतच्या सर्वात जवळ होती. एकीकडे ती सांगते की ती सुशांतच्या भल्यासाठी सर्व डॉक्टरांसोबत को-ऑर्डिनेट करत होती. दुसरीकडे ती सुशांतसाठी ड्रग्सचं को-ऑर्डिनेट करत होती'.

याला बेजबाबदारपणा का म्हणून नये?

अंकिता म्हणाली की, 'जी व्यक्ती हा दावा करत असेल की, ती एखाद्यावर खूप प्रेम करते.  अशात ती व्यक्ती प्रिय व्यक्तीची मेंटल हेल्थ माहीत असूनही त्याला ड्रग्स कसं देणार? तुम्ही असं करणार का? मला नाही वाटत की, असं कुणी करेल. मग याला बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा का म्हणू नये'.

सुशांतच्या ड्रग्सबाबत फॅमिलीला का सांगितलं नाही?

अंकिताने प्रश्न उपस्थित केला की, 'तिच्यनुसार, तिने सुशांतच्या फॅमिलीला ट्रीटमेंटबाबत सांगितलं होतं. पण सुशांत ड्रग्स घेत होता याबाबत सांगितलं होतं का? माझा विश्वास आहे की, असं काही झालं नसेल. कारण कदाचित तिच हे एन्जॉय करत होती आणि त्यामुळे मला वाटतं की, हे कर्म आहे'.

काय म्हणाली होती रिया?

सुशांतला पूर्वीपासून ड्रगचे व्यसन होते, स्टाफच्या माध्यमातून तो त्याची मागणी करीत असे, आपल्या संबंधात आल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार ती शोविक व अन्य स्टाफच्या माध्यमातून गांजा मागवित होते. त्यासाठी बासित आपल्या घरी येत असल्याची कबूली दिली आहे. केदारनाथ चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी तो सेटवर ड्रग घेत होता. आपण त्याला या व्यसनापासून दूर रहाण्यासाठी वारंवार विनंती करीत होते, तो त्यासाठी तयारही होता. मात्र, मानसिक विकारामुळे त्याला ते शक्य झाले नसल्याचे तिने म्हटले आहे. 'तो गांजा सिगारेटमध्ये घालून ओढीत असे, आपण मात्र कधीच ड्रगचे सेवन केले नसल्याचा दावा तिने केला आहे. 

हे पण वाचा :

अंकिता लोखंडेवर बरसली रियाची मैत्रिण शिबानी दांडेकर, नाव न घेता असे केले लक्ष्य

रिया चक्रवर्तीने कोर्टात सांगितलं, ८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटी करतात ड्रग्सचं सेवन....

VIDEO: सुशांतच्या या Unseen व्हिडीओंमुळे उडाली खळबळ; रियाचं पितळ पडलं उघडं?

टॅग्स :अंकिता लोखंडेरिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड