Join us  

अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीची केली पोलखोल, सुशांतचा 'तो' व्हिडीओ शेअर करत केली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 1:58 PM

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर 2 महिन्यांनी रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच बोलली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर 2 महिन्यांनी रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच बोलली आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत रियाने बरेच खुलासे केले आहेत. आजतकसोबत बोलताना रिया चक्रवर्तीने यूरोप ट्रिपच्या आणखी काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, यूरोपच्या ट्रिपवर जेव्हा आपण जात होतो, तेव्हा सुशांतने सांगितले होते की, त्याला क्लॉस्ट्रोफोबिया होता त्यामुळे त्याला फ्लाइटमध्ये बसण्याची भीती वाटते. सुशां  त्यासाठी तो एक औषध घेत होता. ज्याचं नाव मोडाफिनिल आहे. फ्लाइटआधी त्याने ते औषध घेतलं. कारण ते औषध त्याच्याकडे नेहमी राहत होतं. रियाच्या दावा खोडून टाकत सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने तिला चोख उत्तर दिले आहे. 

अंकिताने इन्स्टाग्रामवर सुशांतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सुशांत प्लेन उडवताना दिसतोय. कॅप्शनमध्ये अंकिता लिहिते, ''हा क्लॉस्ट्रोफोबिया आहे का?, तुला नेहमीच उडायचे होते आणि तू ते केलंस सुद्धा.'' सुशांतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. 

खूप खर्चाबाबत सुशांतला टोकले होते 

रियाने सांगितले की, 'पॅरिसमध्ये माझं एक शूट होणार होतं. यासाठी इव्हेंट ऑर्गनाइज कंपनीकडून फ्लाइटची तिकीटे आणि हॉटेलचं बुकींग झालेलं होतं. पण ही सुशांतचीच आयडिया होती की, या निमित्ताने यूरोपची ट्रिप करूया. सुशांतने नंतर माझे तिकीट्स कॅन्सल केले आणि स्वत:च्या पैशाने फर्स्ट क्लासचं तिकीट बुक केलं होतं. मी त्याला म्हणाले होते की, तू फार जास्त पैसे खर्च करतोय'.

 

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडेरिया चक्रवर्ती