Join us  

 तुझी आणि फक्त तुझीच...म्हणत रोमॅन्टिक झाली अंकिता, शेअर केलेत हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 1:46 PM

‘मणिकर्णिका’नंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने अद्याप कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. पण म्हणून अंकिताची चर्चा कमी नाही. सध्या ती  तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

ठळक मुद्देअंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.

‘मणिकर्णिका’नंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने अद्याप कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. पण म्हणून अंकिताची चर्चा कमी नाही. सध्या ती  तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे. कालच अंकिताचा बॉयफ्रेन्ड विकीचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसाला अंकिताने त्याच्यासोबतचे काही रोमॅन्टिक फोटो शेअर केलेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, मि. जैन...,तुझी आणि फक्त तुझीच’असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले.

अंकिता व विकीच्या  अफेअरच्या चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहेत. पण अंकिता यावर काहीही बोलायला तयार नव्हती. पण नुकतीच तिने या नात्याची कबुली दिली होती. विकीसोबतचे  काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून तिने आपल्या प्रेमाची जाहिर कबुली दिली होती. या फोटोत विकी आपल्या गुडघ्यांवर बसून अंकिताला प्रपोज करताना दिसला होता. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान  विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली.  विकी  जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.  सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता व विकी एकमेकांच्या जवळ आलेत. दोघांच्याही मित्रांना या रिलेशनशिपबद्दल ठाऊक होते.

अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत