Join us  

अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले...! प्रशंसेने भारावली अंकिता लोखंडे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 11:06 AM

कंगना राणौत स्टारर ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ‍ झांसी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धूम केली आहे. एकीकडे कंगनाच्या अदाकारीचे कौतुक होतेय. दुसरीकडे झलकारी बाईच्या भूमिकेत दिसलेल्या अंकिता लोखंडे हिच्या अभिनयाचीही

ठळक मुद्दे‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ‍ झांसी’ची लीड अ‍ॅक्ट्रेस कंगना राणौत हिचेही तिने आभार मानले आहेत.

‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ‍ झांसी’ या चित्रपटावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. कंगना राणौत स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धूम केली आहे. एकीकडे कंगनाच्या अदाकारीचे कौतुक होतेय. दुसरीकडे झलकारी बाईच्या भूमिकेत दिसलेल्या अंकिता लोखंडे हिच्या अभिनयाचीही प्रशंसा होतेय. प्रेक्षकांकडून मिळालेल्या या प्रशंसेने अंकिता भारावली नाही तर नवल.

प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर अंकिता जाम खूश आहे. त्यामुळे अख्खी टीम आणि चाहत्यांचे तिने आभार मानले आहेत. ‘मी पहिल्यांदा स्वत:ला मोठ्या पडद्यावर पाहिले. होय, माझे स्वप्न अखेर पूर्ण झाले. मेहनतीचे फळ मिळाले. मणिकर्णिकामध्ये स्वत:ला झलकारी बाईच्या रूपात पाहणे एक भावूक क्षण होता. हा एक जबरदस्त अनुभव होता. माझ्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या, माझे लक्ष्य गाठण्यासाठी मला मला मदत करणाºया प्रत्येकाचे मी आभारी आहे. माझ्यातील छुपी प्रतिमा ताडून मला ओळख देणाºया आणि ‘पवित्र रिश्ता’ सारखा लोकप्रीय शो दिल्याबद्दल एकता कपूर यांचेही मी आभार मानते, असे अंकिताने सोशल मीडियावर लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

केवळ इतकेच नाही तर ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ‍ झांसी’ची लीड अ‍ॅक्ट्रेस कंगना राणौत हिचेही तिने आभार मानले आहेत. कंगना एक सर्वोत्तम सहकलाकार व दिग्दर्शक राहिली. माझ्या मदतीसाठी सतत तत्पर असणाºया आणि चित्रपटाला एक नवी दिशा देणा-या कंगनाचेही आभार. माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणा-या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छिते. यापुढेही सर्वांचे प्रेम मला असेच मिळत राहिल, अशी मी आशा करते, असे अंकिताने म्हटले आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीकंगना राणौत