Join us  

मिलिंद व अंकिताचा ‘बाल्कनी रोमान्स’, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 11:04 AM

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता नेहमीच त्यांच्या फिटनेस व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असतात. सध्या ही जोडी एका रोमँटिक व्हेकेशनवर आहे.

ठळक मुद्देआम्हा दोघांसाठीही वय म्हणजे केवळ एक आकडा आहे, असे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता व मिलिंद म्हणाले होते.  

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता नेहमीच त्यांच्या फिटनेस व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असतात. सध्या ही जोडी एका रोमँटिक व्हेकेशनवर आहे. साहजिकच या व्हेकेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.  अंकिता व मिलिंद दोघांनीही या ट्रिपमधील एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात तो पत्नी अंकितासोबत डान्स करता करता तिला किस करताना दिसला होता.आता या जोडप्याचा बाल्कनी रोमान्सचा फोटो व्हायरल होतो आहे. यात अंकिता व मिलिंद बाल्कनीत एकमेकांना किस करताना दिसत आहेत. 12 डिग्री तापमानात त्यांचा ‘हॉट’ रोमान्स सुरु आहे. बाल्कनी रोमान्सचा हा फोटो मिलिंद व अंकिता दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 मिलिंद हा 53 वर्षांचा आहे तर अंकिताचे वय 27 वर्षे आहे. दोघांमध्ये 26 वर्षांचा फरक असूनही दोघेही रेशीमगाठीत अडकले होते. त्यामुळे या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती.

 वयाच्या अंतरावरून मिलिंद व अंकिता ट्रोलही झालेत. पण दोघांनीही याची कधीच पर्वा केली नाही.अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. वयाच्या पन्नाशीतही तरुणांना लाजवेल अशा जोमात असणारा मिलिंद वास्तविक  स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे वर्कआउट करीत असतो. त्यामुळेच या वयातही तो कमालीचा फिट दिसतो.  

आम्हा दोघांसाठीही वय म्हणजे केवळ एक आकडा आहे, असे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता व मिलिंद म्हणाले होते.  

टॅग्स :मिलिंद सोमण