Join us  

'ॲनिमल' फेम संदीप रेड्डी वांगा यांचं किंग खान शाहरुखच्या टिकेला सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 4:04 PM

'अ‍ॅनिमल' चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे.

अभिनेता रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. 'अ‍ॅनिमल'चं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. पण, चित्रपटाबद्दल विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. चित्रपटाचं जेवढं कौतुक झालं त्याहून कित्येकपटीने याचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीकाही झाली. आता शाहरुख खानचेही नाव या चित्रपटाशी जोडले गेले आहे. 

काही दिवसांपुर्वी किंग खान शाहरुखने 'अ‍ॅनिमल' नाव न घेता टोमणा मारला होता. यासोबतच शाहरुखने नकारात्मक व्यक्तिरेखा साकारण्याबाबत मत व्यक्त केले होते. यावर आता आता स्वत: दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने सर्व टीकांना उत्तर दिलं आहे आणि चित्रपटाबद्दल त्याची बाजू मांडली आहे.  संदीप रेड्डी वांगा यांनी नुकतीच सिद्धार्थ काननला मुलाखत दिली. जिथे त्यांनी चित्रपटाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. 

संदीप रेड्डी वांगा म्हणाले, "ग्लोरिफिकेशन म्हणजे काय हे लोकांना समजत नाही. लोकांना वाटते की शेवटी नायक येईल आणि भाषण देईल, जिथे तो त्याच्या सर्व चुका मान्य करेल आणि त्याचा वाईटप्रकारे मृत्यू होईल. असं काही घडल्यास लोकांना चांगलं वाटतं. मग तुम्ही फक्त समोरच्या आनंदी करत आहात. सामान्य लोक तर सोडा पण बड्या स्टार्सनाही ही गोष्ट समजू शकत नाहीये.

एका कार्यक्रमात शाहरुख म्हणाला होता की, "मी एक आशावादी व्यक्ती आहे आणि लोकांना आनंद देणारे चित्रपट करण्याचा प्रयत्न असतो. मी ज्या नायकांची भूमिका करतो. ते पात्र चांगले काम करतात, प्रेक्षकांना आशा आणि आनंद देतात. जर मी एखाद्या वाईट व्यक्तीची भूमिका केली, तर तो सिनेमाच्या अखेरीस अगदी वाईटरित्या त्याचा अंत होईल याची खात्री मी करून घेतो. कारण, चांगल्या गोष्टींचा विजय आणि वाईट गोष्टींचा अंत व्हायला पाहिजे असा माझा विश्वास आहे". 

 

टॅग्स :शाहरुख खानसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमारणबीर कपूर