Join us  

या कारणामुळे अनिल कपूरला वाटायची घरी मार खाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 6:00 AM

अनिल कपूरनेच ही गोष्ट एका इव्हेंटमध्ये नुकतीच सांगितली आहे.

ठळक मुद्देअनिलने सांगितले की, मला घरात मार मिळावा असे तुम्हाला वाटतेय का? मी अशी दृश्यं दिली असती तर मला घरात सोनम, रिया आणि सुनीता अशा तिघींना तोंड द्यावे लागणार होते.

अनिल कपूरचामलंग हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात अनिलला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्याने दिलेले उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. अनिल कपूर चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन का देत नाही असे त्याला विचारण्यात आले असता त्याने त्यावर मजेशीर उत्तर दिले.

या इव्हेंटमध्ये अनिलला विचारण्यात आले की, आजकालचे तरुण अभिनेते पटकथेच्या गरजेनुसार चित्रपटात इंटिमेट सीन देताना दिसतात. तू असे सीन दिले नाहीस, हे तू आता सगळे मिस करतोय का? त्यावर अनिलने सांगितले की, मला घरात मार मिळावा असे तुम्हाला वाटतेय का? मी अशी दृश्यं दिली असती तर मला घरात सोनम, रिया आणि सुनीता अशा तिघींना तोंड द्यावे लागणार होते. एवढेच नव्हे तर हसत हसत अनिलने सांगितले की, मी असे सीन दिले नाहीत यासाठी आजही मला वाईट वाटते यात काहीच शंका नाही. 

2016 मध्ये आलेल्या २४ या कार्यक्रमात अनिल कपूरचा सुरवीन चावलासोबत किसिंग सीन होता. त्यावर अनिलने सांगितले की, कथानकाची गरज असेल तर मी पडद्यावर किसिंग सीन दिले आहेत. २४ मध्ये लीप लॉक सीन देणे ही त्या कथानकाची गरज होती. 

मलंग चित्रपटाचा पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. यात आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी बोल्ड अंदाजात किस करताना दिसले. या फोटोत दिशा आदित्यच्या खांद्यावर बसली असून त्याला किस करते असे पाहायला मिळाले होते.

त्याआधी रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये आदित्य रॉय कपूर शर्टलेस होऊन रागाने ओरडताना दिसला होता. या फोटोत आर्मी स्टाईलची हेअरस्टाईल आणि दाढीमध्ये तो एकदमच वेगळा दिसला होता. हा फोटो शेअर करत आदित्यने लिहिले होते की, प्रेमासारखेच द्वेषदेखील पवित्र असते.

मलंग या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिकी २चे दिग्दर्शक मोहित सूरीने केले असून भूषण, लव रंजन, अंकुर व जय शेवकरमनी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

टॅग्स :अनिल कपूरमलंग