Join us  

अनिल कपूरच्या पत्नीला आवडत नाही ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 4:45 PM

अनिल कपूर नेहमीच त्याच्या खाजगी आयुष्याविषयी मीडियात बोलताना दिसतो.

ठळक मुद्देइतर बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे मला देखील वाटते की, कोणत्यातरी मासिकासाठी आपण संपूर्ण कुटुंबासोबत फोटोशूट करावे. पण हे शक्य नसते. तिने फोटोशूटसाठी होकार द्यावा यासाठी मी तिच्या हातापाया देखील पडलेल्या आहेत. पण ती फोटोशूटसाठी कधीच तयार नसते. 

अनिल कपूरच्या लग्नाला नुकतेच ३५ वर्षं झाले. बॉलिवूडमधील सुखी जोडप्यांमध्ये त्याची आणि सुनीताची गणना केली जाते. त्याने १९ मे १९८४ ला सुनीतासोबत लग्न केले होते. लग्नाआधी सुनीता आणि अनिल दहा वर्षं एकमेकाला डेट करत होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीताच्या आवाजाच्या मी प्रेमात पडलो होतो अशी कबुली अनिल कपूरने दिली आहे. 

अनिलने या मुलाखतीत सांगितले आहे की, सुनीता एका वेगळ्याच अंदाजात इंग्रजी भाषेत बोलायची. त्याच तिच्या अंदाजावर मी फिदा झालो होतो. मी लग्नानंतर तुझ्यासाठी जेवण बनवणार नाही की लग्नात काही हुंडा घेऊन येणार नाही असे सुनीताने लग्नाच्या आधीच मला सांगितले होते. आपण आपल्या मेहनतीवर सगळे काही निर्माण करूया असे तिने मला सांगितले होते. 

अनिल कपूर नेहमीच त्याच्या खाजगी आयुष्याविषयी मीडियात बोलताना दिसतो. त्याची पत्नी, मुली, मुले यांच्याबाबतीत तो मीडियात मोकळेपणाने गप्पा मारतो. पण त्याची पत्नी सुनीता खूपच कमी वेळा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळते. मीडियापासून दूर राहायलाच तिला आवडत असल्याचे अनिलने नुकतेच सांगितले आहे. 

अनिलला एका मुलाखतीत विचारले होते की, तुमची पत्नी मीडियासमोर का येत नाही यावर अनिलने सांगितले की, सुनीताला सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगायला आवडते. त्यामुळे ती कॅमेऱ्याच्या समोर कधीच येत नाही. याचा अर्थ ती मीडियापासून दूर पळते असे होत नाही. पण तिला सामान्य लोकांसारखे राहायला आवडते. त्यामुळेच ती नेहमी लाइमलाईटपासून दूर राहाणे पसंत करते. सुनीताच्या या निर्णयासाठी मला तिचा आदर वाटतो. कारण प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे. पण तिच्या या निर्णयाचा कधीकधी मला त्रास देखील होतो. इतर बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे मला देखील वाटते की, कोणत्यातरी मासिकासाठी आपण संपूर्ण कुटुंबासोबत फोटोशूट करावे. पण हे शक्य नसते. तिने फोटोशूटसाठी होकार द्यावा यासाठी मी तिच्या हातापाया देखील पडलेल्या आहेत. पण ती फोटोशूटसाठी कधीच तयार नसते. 

टॅग्स :अनिल कपूर